शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

सावधान...! ७ ते १० मेपर्यंत धोका; हवामान विभागाचा इशारा, तापमान दोन अंशाने वाढणार

By रवींद्र चांदेकर | Updated: May 5, 2024 17:35 IST

नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्याचा पारा दोन अंशाने वाढण्याचा इशारा दिला.

वर्धा: नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्याचा पारा दोन अंशाने वाढण्याचा इशारा दिला. तसेच ७ ते १० मेपर्यंत जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी पुन्हा विजांच्या कडकडाटासह गारपीट अथवा वादळी पाऊस होण्याचाही इशारा दिला आहे.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने सूचना जारी केली. त्यानुसार येत्या ४८ तासांत जिल्ह्याचा कमाल पारा दोन अंशांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा पारा ४४ अंशाच्या पार जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यानंतर पुन्हा पारा दोन ते तीन अंशानी खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अर्थात ५ ते ७ मेपर्यंत पारा ४४ अंशाच्या आसपास राहू शकतो. त्यानंतर तो खाली येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे पुढील काही दिवस सावधान राहण्याची गरज आहे. अन्यथा उन्हात फिरणे अंगलट येऊ शकते.

हवामान विभागाने ६ मे रोजी जिल्ह्यात वातावरण कोरडे राहण्याची, तर ७ ते ९ मेपर्यंत जिल्ह्यात एका, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, वादळी पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे. तसेच १० मे रोजी काही भागात तुरळक पाऊस, तर ११ मे रोजी पुन्हा वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत अवकाळी वादळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. टरबूज, संत्रा, पपई, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा हवामान विभागाने गारपीट, वादळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वाऱ्याचा वेगही वाढणार७ ते ९ मे दरम्यान जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे. ७ आणि ८ मे रोजी जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारा वाहणार आहेत. ९ मे रोजी वाऱ्याचा वेग थोडा मंदावणार आहे. या दिवशी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा वाहणार आहे. गारपीट, वादळ आणि पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मात्र झोप उडाली आहे. तथापि, पाऊस आल्यास नांगरणी काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :wardha-pcवर्धा