शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दानपेटी आणि दुचाकी चोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:38 IST

येथील शिवाजी मार्केट परिसरात दोन युवक चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना त्यांना अटक केली.

ठळक मुद्दे१.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त : सहा दुचाकीही सापडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील शिवाजी मार्केट परिसरात दोन युवक चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना त्यांना अटक केली. त्यांना पोलिसी हिसका दाखवित अधिक विचारणा केली असता त्यांच्या या दोघांनी वर्धेसह नागपुरातही दुचाकी चोरी केल्या. शिवाय मंदिरातील दानपेट्याही लंपास केल्याचे समोर आले. यातील एकाच नाव कृष्णा गजानन बलखंडे(२१) रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट असे असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रानुसार, सोमवारी शिवाजी मार्केट मार्गावर हिंगणघाट येथील दोन मुले चोरीची दुचाकी घेवून फिरत आहे, अशी माहिती हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता एक विधी संघर्षित बालक व त्याचा साथीदार कृष्णा बलखंडे हे दोघे एमएच-३२ डब्ल्यु-८६९२ क्रमांकाची दुचाकी घेवून फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून दुचाकीची कागदपत्रे विचारली असता, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्याकडून सदर दुचाकी जप्त केली. सदर दुचाकीबाबत सखोल तपास केला असता, चोरट्यांनी ही दुचाकी सहा महिन्यापूर्वी चोरल्याचे समोर आले.उपरोक्त नमुद विधी संघर्षित बालक व त्याचा साथीदार हे दोघे पक्के चोर असून त्यांनी त्यांनी बुट्टीबोरी, नागपूर शहर व हिंगणघाट येथे बाईक चोरी, मंदिर चोरी व बाईमधील पेट्रोल चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. त्याच्याकडून तपासादरम्यान सहा दुचाकी, मंदिर चोरीतील रोख १,२७० रुपये व इतर साहित्य १०५० रुपये असा एकूण १ लाख ४७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषन पथकाचे निरंजन वरभे, अरविंद येनुरकर, निलेश तेलरांधे, दीपक जंगले यांनी केली आहे.आणखी चोºया उघड होण्याची शक्यतापोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीवर येथील पोलीस ठाण्यात मंदिर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे न्यायालयात या आरोपींची पोलीस कोठडी गरजेची आहे. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने ते शक्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याच्या सहकाºयाना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.