शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:54 IST

सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पंचनामे करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. त्यांचे कृषी विभागानी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशा सूचना वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी शेतकरी समस्या आढावा बैठकीत केल्या.सध्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आलेला असल्यामुळे शेतकºयांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोरे, कापसे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.फवारणी दरम्यान विष बाधित झालेल्या प्रकरणात किटनाशक औषधी विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकºयांना किटकनाशकाची भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देऊन नवीन पीक कर्ज देणे आवश्यक आहे. पीक कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत जमा करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात सोयाबीन व कापूस समाधानकारक असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये अशा सूचना विद्युत विभागाला केल्या. यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा, शेतकरी अन्नसुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या याचाही आढावा घेतला.किशोर तिवारी यांनी यावेळी विविध विषयांवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मात्र देवळी तालुक्यात बोंड अळी प्रकरणी बियाणे कंपन्यांवर नोंदविलेल्या अदखलपात्र गुन्ह्याबाबात कुठलीही चर्चा केली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत सर्वच उदासीन असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले.