शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

संततधार पावसाने पिकांचे नुकसान

By admin | Updated: August 7, 2015 02:00 IST

गत दोन दिवसांत मुसळधार पावसाने आष्टीसह तालुक्यात प्रचंड नुकसान केले.

अनेक घरांत शिरले पाणी : कपाशी ३ हजार तर सोयाबीनची ५ हजार एकरात हानीआष्टी (श.) : गत दोन दिवसांत मुसळधार पावसाने आष्टीसह तालुक्यात प्रचंड नुकसान केले. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड, नदी व नाल्याच्या काठावरील पुरामुळे जमिनी खरडून गेल्यात. यामुळे शेतकऱ्यांना हातचे पीक गमविण्याची वेळ आली आहे. गुरूवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पुर्ववत होत आहे. अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे.लहानआर्वी गावाला लागून वाहणाऱ्या वीरभद्रा नदीने पुरामुळे उग्ररूप धारण केले होते. नदी काठावरील शेतातील पिके खरडून गेलीत. वाघाडी नाल्याला पुरामुळे भगदाड पडल्याने लहानआर्वी, अंतोरा मार्गे जाणारी वाहतूक बंद झाली होती. रस्त्यापर्यंतचा भाग खरडून गेल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. कालव्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण झाली आहे. माणिकनगर मौजातील विद्युतची डीपी पाण्यामुळे वाकली आहे. डीपीजवळील खांबही वाकले आहे. डीपीच्या बॉक्सचे झाकण चोरट्यांनी लंपास केल्याने धोका निर्माण झाला आहे. कैदास नाल्याला पुराचे पाणी आल्याने भगवंत कोहळे, नामदेव जावतकर, संजय शेंडे, निळकंठ कोहळे यांची पऱ्हाटी खरडून वाहून गेली आहे. बेलोरा येथील शेतकरी मनोहर जाणे, चिरकुट बोरवार यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बेलोरा ते अप्पर वर्धा धरण रस्त्यावरील देवडागचा पूल व किशोर जाणे यांच्या शेताजवळच्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वीज वितरण कंपनीचे शेकडो खांब वाकल्याने व तारा तुटल्याने दोन दिवसांत विद्युत पुरवठा बंद होता. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. घरांची पडझड झाल्याने नागरिकांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकसानग्रस्त भागाची तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदी संयुक्तरित्या पाहणी करीत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. प्रत्येक गावातील नाल्या व गटारे मोकळी झाली आहे. गुरूवारी ढगाळ वातावरण होते; पण पाऊस नसल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)