शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; वर्ध्यात विद्यमान भाजप आमदारासह दादाराव केचेंना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:26 IST

वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजुन्यांवर दाखविला विश्वासवर्ध्यात भोयर, हिंगणघाटात कुणावार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.ज्या आर्वी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून माजी आमदार दादाराव केचे व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर दिवे यांच्यात रस्सीखेच सुरू होती, त्यालाही आज विराम मिळाला आहे. या मतदारसंघातून दादाराव केचे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर देवळी मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. येथून शिवसेनेने समीर सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप-सेना युतीचे वर्धा जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत.२०१४ च्या निवडणुकीत डॉ. पंकज भोयर यांनी या मतदारसंघातून ८ हजांरावर अधिक मतांनी विजय मिळविला होता. यावेळी भाजपकडे वर्धा मतदारसंघात सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती.मात्र, मागील पाच वर्षांत या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्याने विद्यमान आमदार भोयर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात समीर कुणावार यांनीच उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. कुणावार यांचे काम पाहून पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर आर्वी मतदार संघात गेल्यावेळी पराभूत झालेले दादाराव केचे यांना यावेळी पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली यादी घोषीत झाली आहे. यात हिंगणघाट येथून अतुल वांदिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कॉँग्रेसचा वर्ध्याचा उमेदवार जाहीर होणे बाकीभारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यात विद्यमान आमदार रणजित कांबळे, अमर काळे यांना अनुक्रमे देवळी व आर्वी मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, वर्धा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. येथे माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे चिंरजीव शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आघाडीच्या वाट्यात राष्ट्रवादीला गेलेल्या हिंगणघाट मतदार संघातही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. येथे माजी आमदार राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी हे प्रबळ दावेदार आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019