लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बँकेतून बोलतो आहे...एटीएम ब्लॉक झाले...लॉटरी लागली आहे...नोकरी लावून देतो...दुचाकी विकायची आहे...असे सांगून सायबर गुन्हेगार सामान्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. लॉकडाऊन काळात आता सायबर भामट्यांनी नवाच फंडा सुरू केला असून रात्रीच्या सुमारास नागरिकांचे फेसबुक मेसेंजर हॅक करून जवळच्या मित्राच्या नावे मेसेज टाकून पैशाची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केला आहे. मेसेंजरवर पैशाची मागणी केलेल्यांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली असून असे झाल्यास थेट सायबर सेलशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व जण घरी बसून असताना सायबर भामटे मात्र, सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी ‘मोडस’ बदलवून नागरिकांना गंडविण्याचा त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. दिवसभर हे भामटे हेर शोधत असून रात्री त्यांच्याकडून पैसे रेटण्याचा धंदा चालविला आहे. सायबर भामटे हायटेक झाले असून नागरिकांचे फेसबुक मेसेंजर हॅक करण्याचा प्रकार सुरू आहे. मेसेंजर हॅक करून ते फ्रेण्डस् लिस्टमधून एखाद्या निकटवर्तीच्या नावे अकाऊंटधारकाला मेसेज टाकून अडचण असल्याचे भासवून पैशाची मागणी करतात. खातेधारकही मित्राने मेसेज केल्याने त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतात आणि त्या फेसबुक अकाऊंट होल्डरची सहज फसगत होते. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सायबर चोरटे रात्रीच करतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज असून कुणी फेसबूक मेसेंजरवर पैशाची मागणी केल्यास थेट सायबर सेलशी संपर्क करण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.सराफा व्यावसायिकालाही गंडविण्याचा प्रयत्नशहरातील एका सराफा व्यावसायिकाचे फेसबुक मेसेंजर हॅक करून त्यांच्याच मित्राच्या नावे मेसेज करून मोठ्या रकमेची मागणी केली. सराफा व्यावसायिकाने पैशाची मागणी केलेल्या मित्राला फोन करून माहिती विचारली असता त्याने पैशाची मागणी केली नसल्याचे सांगितले असता व्यावसायिकाला संशय आला आणि त्यांनी थेट सायबर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मध्यरात्री सराफा व्यावसायिकाचे घर गाठत याबाबत मार्गदर्शन करून अशा फेक मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले.पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला पैशाची मागणीकाही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या मेसेंजरवर त्याच्याच पुतण्याचा मेसेज आला आणि पैशाची मागणी केल्याचे दिसले. एकाच घरात राहून हिंदीत पैशाची मागणी केल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला संशय आल्याने ही बाब उघडकीस आली.
सायबर भामट्यांचा रात्रीस खेळ चाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST
लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व जण घरी बसून असताना सायबर भामटे मात्र, सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी ‘मोडस’ बदलवून नागरिकांना गंडविण्याचा त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. दिवसभर हे भामटे हेर शोधत असून रात्री त्यांच्याकडून पैसे रेटण्याचा धंदा चालविला आहे. सायबर भामटे हायटेक झाले असून नागरिकांचे फेसबुक मेसेंजर हॅक करण्याचा प्रकार सुरू आहे.
सायबर भामट्यांचा रात्रीस खेळ चाले...
ठळक मुद्देमेसेंजर हॅक करीत पैशाची मागणी : वेळीच सावध होण्याची गरज