शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

१५ मे च्या ‘डेडलाईन’ने शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:51 IST

नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अखेरची मुदत १५ मे दिली आहे. ही ‘डेडलाईन’ लक्षात घेत शुक्रवारी व शनिवारी नाफेडला तूर देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देशुक्रवारी आर्वीत विक्रमी आवक : १२८ शेतकºयांची ११३३ क्विंटल तूर स्वीकारली

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अखेरची मुदत १५ मे दिली आहे. ही ‘डेडलाईन’ लक्षात घेत शुक्रवारी व शनिवारी नाफेडला तूर देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.तूर खरेदीला दोनच दिवस राहिले. या दोन दिवसांत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर नाफेड खरेदी करू शकत नाही. यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी होत आहे. शनिवारी बाजार समितीत नाफेडला विक्रमी आवक झाली. एकाच दिवशी १२८ शेतकऱ्यांची ११३३ क्विंटल तूर नाफेडने स्वीकारली. यात आज रविवार असताना उर्वरित शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा सुरू होता. आणखी नोंदणी केलेल्या ११० शेतकऱ्यांची तूर नाफेडने खरेदी करणे शिल्लक आहे. नाफेडने शेतकऱ्यांची तूर खरेदीची अखेरची मुदत १५ मे ठेवल्याने दोन दिवसांपासून नाफेडला तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे नंबर येऊनही मालाचा काटा होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.शनिवारी शेतकऱ्यांनी आर्वी बाजार समितीत तूर आणली. एकाच दिवशी ११३३ क्विंटल तुरीची आवक झाली. नाफेडकडे गोदाम उपलब्ध नसल्याने बाजार समितीच्या यार्डवर आलेल्या ६ हजार कट्टे तुरी बाजार समितीच्या गोदामात पडून आहे. हा माल नाफेडच्या गोदामात जात नाही, तोपर्यंत चुकाऱ्यांना गती येणार नाही, असे समितीने सांगितले. समितीकडे ११० शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद असून ती १४ व १५ या दोन दिवसांत पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले.आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची तूर आवक सुरू आहे. एकाच दिवशी १२८ शेतकºयांची तूर स्वीकारली. उर्वरित नोंद केलेल्या शेतकऱ्यांची तूर स्वीकारली जाईल. यासाठी नाफेडने माल ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृउबास, आर्वी.