शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वतः बरबडी येथे जावून शेतकऱ्यांना करून दाखवले. जिल्हाधिकारी थेट शेतापर्यंत आल्याने बरबडी येथील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्यच संचारल्याचे बघावयास मिळाले.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. १३ ऑगस्टला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ॲप कार्यान्वित करण्यात आले असून, ॲपबाबत शेतकऱ्यांना नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या जाणवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथे सोनोबा गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात जात शेतातील पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करून दाखवली. शेतात टमाटर, वांगी आणि दोडके या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेचीसुद्धा नोंद ॲप मध्ये करून दिली. तसेच प्रभाकर लेंडे या शेतकऱ्याच्या शेताचीही पाहणी करून ॲपमध्ये उभ्या पिकाची नोंद करण्यात आली. यावेळी बरबडीच्या सरपंच संगीता शिंदे, उपविभागीय महसूल  अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत आदींची उपस्थिती होती.ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेचई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अतिशय सोपे असून, यामध्ये शेतकरी कधीही त्यांच्या खरीप, रबी व उन्हाळी पिकाची नोंद घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

एका मोबाईलद्वारे २० शेतकऱ्यांच्या पिकाची घेता येते नोंदएका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांची पिकाची  नोंद घेता येते. त्यामुळे ॲण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइलवरून  इतर शेतकऱ्यांच्या पिकाची  नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्यात.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती