शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता.

ठळक मुद्दे६.९५ कोटींची भरली रक्कम : ३९ हजार ५५५ हेक्टरवरील पिकाला संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाची अवकृपा झाल्यास झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले आहे. सदर शेतकºयांनी नगदी पिकासाठी ५ टक्के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकांसाठी २ टक्के अशी एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये पीक संरक्षीत रक्कम म्हणून भरली आहे. एकूणच ३९ हजार ५५५.२१२ हेक्टर वरील पिकांना विम्याचे कवच यंदा देण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता. त्याचाच परिणाम यंदा सुरूवातीला पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत दिसून आला. सुरूवातीला शेतकऱ्यांनीही पीक विमा काढण्याच्या विषयाकडे पाठच दाखविण्यात धन्यता मानली होती. परंतु, नंतर पीक विमा काढणाऱ्यांचा आकडा कासवगतीने का होईना पण वाढला. यंदा खरीप हंगामात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.४२७.८३ हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका२६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १६२.९८ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्या आत तर २६४.८५ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यंदा भारतीय कृषी विमा कंपनी देणार नुकसान भरपाईगत वर्षी खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई इक्को टोकीयो या विमा कंपनीने पीक विम्याचे कवच घेतलेल्या शेतकऱ्यांना दिली होती. तर यंदाच्या वर्षी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हिच विमा कंपनी पीक विमा काढलेल्या शेतकºयांना देणार आहे.व्यक्तिगत तक्रार करण्यात आर्वी तालुका पुढेसोयाबीन, तूर आणि कपाशी उत्पादकांचे परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. काही शेतकºयांनी झालेल्या नुकसानीबाबत थेट कृषी विभागाला तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ८७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने या तक्रारींचे दोन गटात विभागणी केली असून कापणीपूर्व गटात ४६ तर कापणी पश्चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाने केल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने ६१४ शेतकऱ्यांची वाढविली अडचणयंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली. २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे ६१४ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणीवादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभाग आणि विमा कंपनीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी घायतिडक तसेच तहसीलदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकरी अशोक नागतोडे, भिमराव भगत, ज्ञानबा ढोले, गणेश राऊत, घनश्याम भूरे यांच्याशी संवाद साधला. शिवाय त्यांच्या शेताची पाहणी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा