शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पीकवीमा कंपन्या मालामाल, हवालदिल बळीराजा कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गाकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती दिली. खरीप २०२०-२१ या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १११ कोटी १७ लाख १ हजार ९४३ रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे संरक्षित करण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी भरले साडेचार कोटी : आतापर्यंत मिळाले ३५ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून दिलासा मिळावा याकरिता शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या लाभाकरिता गेल्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ४ कोटी ४४ लाख २८ हजार ४०४ रुपये विमा कंपनीला भरले पण, कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ ३५ लाखांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे या पीकविमा योजनेने कंपन्या मालामाल होत असून शेतकरी अद्यापही कंगाल असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गाकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती दिली. खरीप २०२०-२१ या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १११ कोटी १७ लाख १ हजार ९४३ रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे संरक्षित करण्यात आली होती. गेल्यावर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७६६ शेतकऱ्यांनी २५ हजार २७ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यातूनच विमाहप्त कापण्यात आला. शेतकऱ्यांनी तब्बल ४ कोटी ४४ लाख २८,४०४ रुपयांचा हप्ता कंपन्यांकडे जमा केला. तसेच केंद्र व राज्य शासनानेही प्रत्येकी ६ कोटी १५ लाख १० हजार ९८५ रुपये आणि सुरक्षित रक्कम मिळून १११ कोटी १७ लाख १ हजार ९४३ रुपये विमा कंपन्यांकडे जमा केले. पण केवळ १८७ शेतकऱ्यांना ३५ लाखांचा मोबदला देण्यात आला.

१७,९८२ शेतकऱ्यांना लाभासाठी केले रिजेक्टजिल्ह्यातील आठही तालुक्यातील २७ हजार ७६६ शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ मिळवा याकरिता वीमा कंपनीकडे ४ कोटी ४४ लाख २८ हजार ४०४ रुपयांचा भरणा केला होता. गेल्या हंगामात सुरुवातीलाच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यानंतर सोयाबीनचे बोगस बियाणे तर कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंड अळीने मोठे नुकसान केले. इतकेच नाही अखेरच्या टप्प्यात अवकाळीनेही दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमांचा आधार मिळण्याची अपेक्षा होती. 

केंद्र सरकारने नियमावली बदलावीविमा कंपन्या शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम जमा करतात. मात्र, पुरेसा मोबदला दिला जात नाही. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे सुधारणा करण्याची मागणी केली. परंतु, अद्याप दखल घेतली गेली नाही. केंद्राने नियमावली बदलविली तरच विमा कंपन्यांची नफे खोरी संपू शकेल, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

परंतु, विमा कंपन्यांकडून केवळ ९ हजार ७८४ शेतकऱ्यांना विमाकरिता पात्र ठरविले आहे. त्यातील १८७ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत ३५ लाखांचा वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे या आपत्तीकाळतही १७ हजार ९८२ शेतकऱ्यांना विमा योजनेतून बाद करण्यात आले.

विमा भरुनही भरपाई नाही

पीकांंना संरक्षण मिळावे म्हणून अडीच एकराचा पीक विमा उतरविला होता. पीककर्जातूनच विम्याचा हप्ता कंपनीकडे वळता करण्यात आला.गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि बोंडअळीचा मोठा फटका बसला पण, अद्यापही विमाचे संरक्षण मिळालेले नाहीत. त्यापूर्वीही असाच अनुभव आल्याने पीकविमा हा शेतकºयांच्या हिताचा नसल्याचे दिसून येत आहे.- पंकज वैद्य, युवा शेतकरी.

शेतकऱ्यांसाठी पीकविमा हे दिवास्वप्नच ठरत आहे. कारण विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मीही सतत पीकविमा उतरवित आहे. त्याच्या हप्त्याची रक्कम दरवर्षी पीककर्जातून वळती होते. पण, नुकसानीनंतरही विम्याचे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे यासंदर्भात मी ऑनलाईन तक्रार सुद्धा केली आहे.- दिलीप पांडे, शेतकरी, दिघी.

पीक विमा उतरविल्यानंतरही त्याचा काही फायदा मिळत नाही. परंतु पीककर्ज घेतल्यानंतर त्यातून आपसुकच पीकविम्याची रक्कम वळती केली जाते. त्यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तरी दिसून येते. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने पीक विमा काढण्यासाठी शेतकरी उत्साही नाहीत. यात शेतकऱ्यांपेक्षा कंपनीच मालामाल होत आहे.- रवी इखार, शेतकरी, रोहणा.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती