वर्धा : जिल्ह्यात खादीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे खादीच्या प्रसारासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. सोबतच जिल्ह्यात पेळू मशीन व शंभर अंबर चरखे शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सेंद्रीय शेतमाल उत्पादक गटामार्फत संचालित व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ पुरस्कृत वर्धा शहरातील स्वदेशी भवन येथे खादी प्रसार व प्रचार कार्याची वर्षपूर्तीनिमित्त खादी शताब्दी वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र खादी ग्रामद्योग संघाचे अध्यक्ष भैयासाहेब मशानकर तर अतिथी म्हणून माजी खासदार दत्ता मेघे, सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयंत मठकर, जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे उपस्थित होते. उद्घातक दत्ता मेघे यांनी सावंगी रुग्णालयात दरवर्षी पाच लाख रूपयांची खादी खरेदी करणार असल्याचे सांगितले. आपण नेहमी खादीचा रूमाल व काही प्रमाणात कपडे वापरत असल्याचे सांगत जिल्ह्यात खादीचा वापर वाढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मठकर म्हणाले, जिल्ह्यात नवीन गावांमध्ये खादी निर्मितीचे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोबतच खादीच्या इतिहास व विचार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये पोहचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन संजय बेहरे यांनी केले. शॉल व श्रीफळ देऊन पाहुण्याचे स्वागत जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, ज्ञानेश्वर ढगे, अनंत ठाकरे यांनी केले. यशस्वीतेकरिता दिनेश काकडे, यशवंत ढगे, मंगेश शेंडे, गजानन नेहारे, चंदू ढगे, बळवंत ढगे, शुभम भोगे, माधुरी चांभारे, योगिता नासरे, संगिता चिखलकर, शुभम ढोकले, सरोज चव्हाण, दर्शना जाधव, भाऊराव काकडे, गोविंदा पेटकर, कुकडे, झाडे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
खादी प्रसारातून रोजगार निर्मितीला वाव
By admin | Updated: September 30, 2015 05:50 IST