शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अपंग व्यक्तींचा रेकॉर्ड नव्याने तयार करा

By admin | Updated: July 18, 2014 00:17 IST

गावातील अपंग बांधवांची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेऊन अपंगांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राप्त ३ टक्के निधी खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़

निवेदन सादर : संघटना आंदोलनाच्या तयारीतसेलू : गावातील अपंग बांधवांची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेऊन अपंगांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राप्त ३ टक्के निधी खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला़ याबाबत गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांना निवेदन सादर करण्यात आले़ अपंगांच्या न्याय्य मागण्यांबाबत संघटनेच्यावतीने अपंगाचे एक शिष्टमंडळ गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. या निवेदनाची दखल घेत आपल्या प्रलंबित मागण्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ. शबाना मोकाशी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. अपंगाची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतला घेण्याबाबत ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासनातर्फे सप्टेंबर २०१३ मध्ये आदेश पारित करण्यात आले; पण आदेशानंतरही अपंगांची नोंद ग्रा़पं़ मध्ये घेण्यास टाळाटाळ केली जात आहे़ यासाठी अपंगांना ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत़ ग्रा़पं़ कार्यालय सदर निधी राखीव ठेवत आहे वा नाही, याबाबतही माहिती दिली जात नाही़अपंग बांधवांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पाचे ३ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना तो खर्च केला जात नाही. शासनाचा हा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी शिल्लक राहतो़ अद्यापही हा निधी अखर्चित आहे. याची दखल घेत शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून अपंग बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली़ सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोकाशी यांना निवेदन सादर करताना प्रहार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील मिश्रा, संजय धोंगडे, प्रफूल नरानिया, वामन चौधरी, नरेश खोडके, संजय वांदिले, सुधाकर गांजरे, महेंद्र भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)