शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वेडसर महिलेला लागला लोकमतचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुकानाच्या आडोशाने रात्र घालविणे तिचा नित्यक्रम ठरला आहे. मानसिक स्थिती चांगली असल्यावर मराठी भाषेवरील प्रभुत्व आवर्जून लक्षात येते.

ठळक मुद्देतासन्तास मजकुराची उजळणी : वाचनाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची लोकांत चर्चा

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नित्यनियमाने एक वेडसर महिला स्थानिक बसस्थानक चौकातील पान सेंटरवर येऊन लोकमत पेपरचे जोराने वाचन करीत असते. दररोज घडणाऱ्या घटनांबाबत उपस्थितांना अवगत करीत असते. तिच्या या आगळ्यावेगळ्या व दररोजच्या उपक्रमाची तसेच लोकमत प्रती असलेल्या जिव्हाळ्याची चांगलीच चर्चा होत आहे.तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुकानाच्या आडोशाने रात्र घालविणे तिचा नित्यक्रम ठरला आहे. मानसिक स्थिती चांगली असल्यावर मराठी भाषेवरील प्रभुत्व आवर्जून लक्षात येते. दहावीपर्यंतच शिक्षण तसेच वाचनाची आधीपासूनच गोडी असल्याने तिचा वेडसरपणा याला अडसर ठरला नाही, असेच म्हणावे लागत आहे. पान सेंटरवर केवळ लोकमत वृत्तपत्राची आग्रहाने मागणी करून त्याचे एक तास पर्यंत वाचन तसेच महत्वाच्या बातम्यांची उजळणी करणे तिची हॉबी ठरली आहे. काही वर्षापूर्वी पतीबा मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा व दोन मुली असा तिचा संसार आहे. मुलाचे आंजी व देवळीत घरदार आहे. शेतीवाडी व कृषिसंबंधित व्यवसाय आहे. परंतु मुलाने अनेकदा आग्रह करूनसुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दररोजची भटकंती हीच तिच्या नशिबाची खऱ्या अर्थाने सवंगडी ठरली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्या वाचनामुळे तिला मिळणारा दिलासा अलौकिक व मनाला समाधान देणारा ठरला आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत