लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये गुराखी विश्वनाथ लक्ष्मण राऊत (६५) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतकाच्या कुटुुंबियांना आर्थिक मदत केली.सोमवारी गुराखी विश्वनाथ राऊत हे नेहमीप्रमाणे जनावरांचा कळप घेवून धाडी जंगलातील कक्ष क्रमांक १११ आर.एफ. मध्ये गेले होते. परंतु, रात्री उशीर होऊनही ते घरी परतले नसल्याने शोधाशोध करण्यात आली. दरम्यान त्याचा मृतदेह जंगलात आढळून आला. जनावरे चारत असताना दुपारच्या सुमारास अस्वलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविला जात होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून हा हल्ला अस्वलीने केला असावा असे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी जंगलात गुराखी विश्वनाथ राऊत यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अमोल चौधरी, क्षेत्रसहाय्यक एन. व्ही. धुळे, वनरक्षक एस. आर. कोटजावरे आदींनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित अधिकाºयांना मृतकाच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कार्यवाहीही झाली.
अस्वलीच्या हल्ल्यात गुराखी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:39 IST
जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये गुराखी विश्वनाथ लक्ष्मण राऊत (६५) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतकाच्या कुटुुंबियांना आर्थिक मदत केली.
अस्वलीच्या हल्ल्यात गुराखी ठार
ठळक मुद्देधाडी शिवारातील घटना : मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून अर्थिक मदत