शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:28 IST

जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले.

ठळक मुद्देएकूण १०१ टेबल : तालुकास्थळी जाहीर होणार बहुमताचा कौल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले. रविवारी एकूण ६ हजार ६९९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारी वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या आठही तालुक्यांच्या स्थळी सकाळी १० वाजतापासून एकूण १०१ टेबलवरून मतमोजणी होणार आहे.वर्धा तालुक्यातील ५५ ग्रा.पं.ची मतमोजणी सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात १५ टेबलवरून, सेलू तालुक्यातील ३१ ग्रा.पं.ची मतमोजणी दीपचंद चौधरी महाविद्याल सेलू येथे १० टेबलवरून, देवळी तालुक्यातील ४५ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय देवळी येथे १२ टेबलवरून, आर्वी तालुक्यातील २२ ग्रा.पं.ची मतमोजणी गांधी विद्यालय आर्वी येथे ८ टेबलवरून, आष्टी तालुक्यातील १७ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय आष्टी येथे ७ टेबलवरून, कारंजा (घा.) तालुक्यातील ३२ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय कारंजा येथे १२ टेबलवरून, हिंगणघाट तालुक्यातील ५६ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे १६ टेबलवरून आणि समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय समुद्रपूर येथे २१ टेबलवरून होणार आहे. आक्षेप घेणाऱ्याला तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करावी लागणार आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. पोलीस बंदोबस्तामुळे मतमोजणी होणाऱ्या ठिकाणांना पोलीस छावणीचेच स्वरूप येणार आहे. असे असले तरी वर्धा येथे १२१, देवळी येथे १००, सेलू येथे ७०, आर्वी येथे ५५, आष्टी येथे २८, कारंजा येथे ५०, हिंगणघाट येथे ७० तर समुद्रपूर येथे ८० कर्मचाºयांच्या सहकार्याने मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.परवानगीशिवाय प्रवेश नाहीचमतमोजणीच्या ठिकाणी कुणालाही परवानगी शिवाय जाता येणार नसून सदर परिसरात शांततेत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण व्हावी या हेतूने तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत