शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा बाळगणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:27 IST

येथे बनावटी नोट चालवून व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल २१ बनावट नोटा जप्त केल्या आहे.

ठळक मुद्दे५०० रुपयांच्या २१ नोटा जप्त : समुद्रपूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथे बनावटी नोट चालवून व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला समुद्रपूर पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल २१ बनावट नोटा जप्त केल्या आहे. सदर आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.पोलीस सूत्रानुसार, ५०० रूपयाच्या नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजु भास्कर इंगोले (३२) रा. नांदोरा (डफरे) ता. देवळी जि. वर्धा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सदर आरोपीने शुक्रवारी रात्री नवनीत गंगशेट्टीवार यांच्या दुकानात येत हळदीचे दोन पाकिट खरेदी केले. त्यावेळी त्याने व्यावसायिकाला ५०० रुपयांची नोट दिली. त्यानंतर उर्वरित पैसे घेवून आरोपीने तेथून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटातच सदर नोट बनावट असल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याचीही भांबेरी उडाली होती.दरम्यान व्यापाºयाने आरोपीचा शोध घेवून सदर नोट बदलवून घेतली. त्यानंतर सदर व्यापाºयाने आरोपीजवळ पेढ्याचा डबा दिसल्याने मिठाई विकेत्याचे दुकान गाठून तुम्हाला सदर व्यक्तीने कुठली नोट दिली याची विचारणा केली. सदर नोट बघितल्यावर तीसुद्धा बनावट असल्याचे पुढे आले. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने सदर आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्याच्याजवळून एकाच नंबरच्या सहा तर वाहनात ठेऊन असलेल्या एकाच नंबरच्या १५ नोटा जप्त केल्या आहे. पोलिसांच्या अधिक चौकशीत सदर आरोपीने यापूर्वी मध्य प्रदेशातही अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर यांनी केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक