शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वेचणीच्या कापसाला दहा दिवसात फुटले कोंब; शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:48 IST

Wardha News Cotton कापूस वेचणी करून घरात भरून ठेवल्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्याला पुन्हा कोंब फुटल्याने वर्धा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देपाईकमारी येथील शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांच्या शेतात घडला प्रकार८ एकरांतील निघाला होता २० किंटल कापूसकोंब फुटून असलेल्या कापसाला किती मिळणार भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: यंदाच्या वर्षी सततच्या पावसाने जिल्ह्यातील कापुस उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. समुद्रपुर तालुक्यातील पाईकमारी या गावातील दोन शेतकऱ्यांना ८ एकर शेतजमिनीवर कापुस उत्पादन्न घेण्यासाठी ८५ हजाराचा खर्च आला आहे.पण प्रत्यक्षात कापसाची वेचणी केल्यावर या शेतकऱ्याला सध्या २० क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले व तो कापुस त्यांनी घरात भरुन ठेवला असता त्या कापसाला फक्त दहाच दिवस झाले असतांनाच कापसाला अक्षरश: कोंबच फुटले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील पाईकमारी येथील रहिवासी असलेले कैलास देवतळे व गणेश लढी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्या शेतात ८ एकर शेतात कापसाची लागवड केली होती सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने पाहाणी असल्याने पिकाची वाढ व फुले बोंडे बऱ्याच पैकी होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पिकांची परिस्थिती बघितल्यावर भरघोस उत्पन्न होईल असे वाटत होते. परंतु सप्टेंबर महिन्यात आलेल्या सततच्या पावसाने उभ्या फुटलेल्या कापसाच्या पिकाला चांगलाच फटका बसवला व त्यामुळे कापुस शेतातच पडायला लागला.

अशातच सम्पुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने आणि हवामान खात्याकडून पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या दोन्ही शेतकऱ्यांनी घावपड करत वेचणी करीता मजुर आणले व शेतातील कापसाची वेचणी केली. वेचणी अंती त्यांना कापसाचे ८ एकर मध्ये एकूण २० क्विंटल उत्पन्न झाले व त्यांनी ह्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने कापुस घरी भरुन ठेवला. परंतु कापसाला घरीच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्पादकांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांनी केली आहे. हीच परिस्थिती जर पुन्हा काही शेतकऱ्यांनवर येण्याची वेळ असून हवालदिल शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस