शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बोंडअळीच्या सावटातही कपाशीचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:03 IST

गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्दे९९.५० टक्के पेरणी पूर्ण : सोयाबीनचे क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत ९९.५० टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. खरीप २०१८-१९ मध्ये २ लाख ४ हजार २०३ क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. नियोजित क्षेत्र २ लाख २६ हजार ३६३ निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात २४ हजार ७९८, आष्टी तालुक्यात १० हजार ७८४, कारंजा तालुक्यात २३ हजार ९१०, वर्धा तालुक्यात २९ हजार २००, सेलू तालुक्यात २७ हजार ७५, देवळी तालुक्यात २८ हजार ६४६, हिंगणघाट तालुक्यात ४३ हजार ३९८, समुद्रपूर तालुक्यात ३८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. एकूण कपाशीचे क्षेत्र २ लाख २५ हजार २२९ हेक्टर असून आतापर्यंत ९९.५० टक्के हेक्टरवर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीवर रोग आल्याने उत्पादनात घट झाली होती. तसेच किडीमुळे कापूस वेचणीच्या कामावर महिला मजूर येण्यास तयार होत नव्हते. यामुळे गावाबाहेरून मजूर बोलावून अनेक शेतकºयांनी कापसाची वेचणी केली. क्विंटलमागे किमान ६०० रुपये अतिरिक्त खर्च शेतकºयांना कापूस वेचणीसाठी आला. कापसाचा भाव ५ हजार ५०० च्या वर गेला नाही. त्यामुळे कापूस शेती तोट्यात राहिली. यंदाही किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे कृषी विभागाने उन्हाळ्यातच जाहीर केले असतानाही कापूस क्षेत्र खरीप घटलेले नाही. कापसाचा पेरा वाढलेलाच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनही मोठ्या प्रमाणावर होते. यंदामात्र सोयाबीनचे क्षेत्र घटल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे नियोजन क्षेत्र १ लाख १७ हजार निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७, आष्टी ८ हजार ६७४, कारंजात १२ हजार १५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ७ हजार ९७०, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १४ हजार ८५६, समुद्रपूर २० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत ९५.७६ टक्के लागवड पूर्ण झाली. सोयाबीनकडे वळलेला शेतकरी गतवर्षी कापूस पिकाकडे होता. यंदा हे क्षेत्र घटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविली जात होती. मात्र, कापसाचा पेरा कमी झाल्याचे दिसून येत नाही.निवडणुकीच्या वर्षात दरवाढीची आशा२०१९ हे देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे कापसाला निश्चितपणे जादा भाव ठेवण्यासाठी सरकारी धोरण कारणीभूत ठरतील. अशी आशा शेतकºयांना आहे. त्यामुळे हमी भाव लक्षात घेऊन शेतकºयांनी कापूस पेरणीकडे आपला कल दाखविला आहे. तसेच राज्य सरकार कापूस उत्पादकांना काही सवलतीच्या योजना देतील त्यामुळे भाव वाढेल, अशी आशा असल्याने कापसाचा पेरा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती