शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेलू बाजारपेठेत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:41 IST

सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू येथील उपबाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. खरेदीच्या मुहुर्तापासून आजपर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर गुरुवारला कापसाला ६ हजार रूपये भाव मिळाला.

ठळक मुद्देकापसाला ६ हजार रूपये भाव : लिलाव पद्धत सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू येथील उपबाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. खरेदीच्या मुहुर्तापासून आजपर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर गुरुवारला कापसाला ६ हजार रूपये भाव मिळाला.या बाजार समिती अंतर्गत एकूण ११ जिनिंग असले तरी सिंदी येथे ४ तर सेलू येथे ७ जिनिंग कार्यरत आहे. या ७ जिनिंगमध्ये ६ खरेदीदारांना बाजार समितीचा परवाना तर एका खरेदीदाराला थेट परवाना आहे. बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांनी सुध्दा सहकार्य दिले. नव्याने आलेल्या खरेदीदारांना संधी दिल्याने येथे कापूस खरेदीदार वाढले, लिलाव पध्दतीत योग्य भाव देण्याचा प्रयत्न, कापूस खरेदीत अडत नाही. कापूस विकताच शेतकºयांना चुकाऱ्याचा धनादेश याकडे बारकाईने लक्ष असल्याने आर्वी, खरांगणा, आंजी येथे जाणारा कापूस रोखण्यात काही प्रमाणात यश आल्याने सेलूची बाजारपेठ पांढऱ्या सोन्यानी फुलली आहे. अवघ्या काही दिवसात पुन्हा सेलूच्या बाजारपेठेत नविन खरेदीदार आपली कापूस खरेदी सुरू करणार असल्याने खरेदीदाराची वाढती संख्या पाहता कापसाच्या भावात तेजी राहणार असल्याचे संकेत आहे. बाजार समितीने वीज, सर्पदंश, विद्युत प्रवाहाने बैलाचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना १० हजार रूपये तर गंभीर आजाराच्या उपचारासाठी शेतकऱ्याला ५ हजार रूपये देण्याचा निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. एकूनच या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कापूस विक्रीत मोठा फायदा होईल असे दिसून येत आहे.बाजारपेठेत शेतकऱ्यांनी आपला कापूस अनामतमध्ये देवू नये. दिल्यास चुकाऱ्याची हमी बाजार समितीची नाही. व्यापाºयांना प्रत देवून अनामत पध्दतीला विरोध केला आहे. तसेच कापूस विकल्या नंतर दुसºया दिवशी धनादेश वटला नाही तर कापूस उत्पादकांनी थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. - विद्याधर वानखेडे, सभापती, कृ.उ.बा.स. सिंदी.

टॅग्स :cottonकापूस