शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे भाव ६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:00 IST

मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असून या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देवाढीव भावाचा फायदा व्यापाऱ्यांनाच : हिंगणघाटात ५ हजार ९६०

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असून या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.कापसाचे भाव सहा हजारावर पोहचल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात कापसाची आवक वाढली आहे. मागील पंधरवाड्यात कापसाच्या भावात मोठी घसरण सुरू होती. त्यामुळे आर्वीच्या बाजारापेठेत कापसाची आवक मंदावली होती; पण गेल्या चार-पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आली. शिवाय दर सहा हजारावर पोहचले. आतापर्यंत आर्वी बाजारात १ लाख ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ हजार ९६ क्विंटल तूर, ६ हजार ५०४ क्विंटल चना आणि ५० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कापसाच्या भावात अचानक तेजी आल्याने खाजगी कापसाची आवक सध्या जोरात सुरू आहे. यात पहिल्या व चांगल्या प्रतीच्या कापसाला ६ हजार रूपये तर फरतड कापसाला ४,४०० ते ४,५०० रूपये खाजगी बाजारात भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना भाव वाढण्याची प्रतीक्षा होती. या प्रतीक्षेनंतर भावात तेजी आल्याने शेतकºयांनी खासगी बाजारात कापूस विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे.सेलूत ५ हजार ९७५ रूपये भावघोराड- मंगळवारी सेलू येथे ५ हजार ५०० ते ५ हजार ९७५ रूपयावर भाव स्थिरावले. सर्वाधिक कापूस ५ हजार ५००, ५ हजार ७०० या भावात व्यापाºयांनी खरेदी केला. सेलू येथे लिलाव पध्दतीने कापूस खरेदी केली जाते. त्यानुसार शेतकºयांना भाव दिला जात आहे. त्यामुळे या भावात चढउतार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.गेल्या चार-पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आली असून कापसाचा भाव सहा हजारावर गेला आहे. शेतकºयांनी या वाढलेल्या भावाचा लाभ घ्यावा.- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

टॅग्स :cottonकापूस