शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

८४ हेक्टरवरच कपाशीची लागवड

By admin | Updated: June 11, 2017 00:46 IST

कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते.

मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ : दमदार पावसाशिवाय पेरणीची घाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते. बेभरोशाच्या पावसामुळे या पेरणीकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पाठ होत असल्याचे दिसत आहे. मान्सूनचा पाऊस येण्याचे संकेत असताना या खरीपात मान्सूनपूर्व पेरणीच्या नावावर केवळ ८४ हेक्टर म्हणजेचे २१० एकरावर कपाशीची लागवड झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी पाऊस येण्यापूर्वी हा पेरा ६५२ हेक्टरवर झाला होता. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता कापूस उत्पादकांकडून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करण्यात येत होती. दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी हळूहळू या मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ होत असल्याचे दिसून आले. यंदाच्या खरीपात दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या नियोजनात करण्यात आला आहे. यात मान्सूनपूर्व पेरणी होईल, असे कृषी विभागाला वाटत असताना याकडे मात्र शेतकऱ्यांची पाठच होत असल्याचे झालेल्या नोंदीवरून दिसून येत आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा यात घट होणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनाच्या आधारावर जिल्ह्यात ओलिताची सोय वाढत आहे. मध्यंतरी या ओलिताच्या आधारावर शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाली होती; मात्र उन्हाचा पारा वाढून पाऊस येण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. यामुळे गत दोन-तीन वर्षांपासून या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ केल्याचे दिसून आले आहे. यामागे निसर्गाचा असमतोल एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मोड येण्याची शक्यता सध्या आर्थिक परिस्थितीने खचलेला शेतकरी कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. यामुळे बऱ्याच भागात ओलिताची सोय असतानाही पाऊस आल्याशिवाय लागवड नाही, अशी भूमिका घेताना शेतकरी दिसत आहे. गत वर्षी कपाशीची मान्सूनपूर्व लागवड करून पाऊस उशिरा आल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नसल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक लागवड आर्वी तालुक्यात यंदाच्या खरीपात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड जिल्ह्यात सुरू आहे. कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या आर्वी भागात सर्वाधिक क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र ४४ हेक्टरवर आहे. तर देवळी तालुक्यात २५ आणि वर्धा तालुक्यात १५ हेक्टरवर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड झाल्याची नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात झाल्याची माहिती आहे. ही लगवड गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे गत वर्षीच्या नोंदीवरून दिसत आहे.