शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दगदगीतून आरामासाठी ट्रॅक्टरवरच बांधली ‘खाट’

By admin | Updated: December 9, 2015 02:36 IST

वाहन चालकाने मुक्कामाच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच थकलेल्या शरीराला विसावा मिळावा म्हणून वाहनावरच शयनकक्ष थाटले.

वाहन चालकांची नामी शक्कल : ऊस तोडणी ते कारखान्यात पोहोचेपर्यंतची वेळ घालविण्यासाठी कसरतप्रफूल्ल लुंगे सेलूवाहन चालकाने मुक्कामाच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच थकलेल्या शरीराला विसावा मिळावा म्हणून वाहनावरच शयनकक्ष थाटले. हे चित्र ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सध्या पाहायला मिळत आहे. छताची व्यवस्था नसलेल्या ट्रॅक्टरवर ही किमया साधण्याची कला सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. हे शयनकक्ष हुबेहुब झोपाळ्यासारखे दिसत असल्याने ‘ट्रॅक्टरकम शयनयान’ हा फॉम्यूला जवळपास सर्वच ट्रॅक्टर वाहनचालक तयार करून घेताना दिसतात.सध्या ऊस कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. कापलेला ऊस ट्रॅक्टरच्या साह्याने कारखान्यापर्यंत पोहोचविला जात आहे. दिवसभर मजुरांकडून ऊसाची तोडणी केली जाते. सायंकाळच्या सुमारास भरलेली ऊसगाडी कारखान्यात पोहोचविली जाते. तेथे नंबर लावल्यानंतर वाहन चालकाला वाहन सोडून जाता येत नाही. यामुळे वाहनाशेजारीच अंथरून टाकून विश्रांती करावी लागते. किमान चार ते पाच तासानंतर नंबर लागतो. यानंतर गाडी आत घेण्यात येते. तेथे गाडी रिकामी करेपर्यंत दोन ते तीन तास थांबावे लागते. या वेळेत विश्रांतीसाठी वाहन चालकाला रात्रीच्या सुमारास वाहनावरच अवलंबून राहावे लागते. यातूनच वाहन चालकांनी ही नामी शक्कल शोधून काढली आहे.एरवी रेल्वेत झोपण्याची व्यवस्था असते. स्लीपर कोच, व्हाल्वोमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध असते. चारचाकी छत असलेल्या वाहनांत मुक्कामाच्या ठिकाणी चालकाला विश्रांतीसाठी सीटचा आधार असतो; पण छताची व्यवस्था नसलेल्या ट्रॅक्टरवर शयनकक्षाची किमया चालकांनी साधली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी थकलेल्या शरीराला आरामासाठी ट्रॅक्टरवरच खाट तयार केली आहे.तब्बल आठ तासांची असते प्रतीक्षाऊस तोडणी कामगारांकडून ऊसाची तोड केली जाते. यानंतर तो ऊस वाहनांमध्ये भरला जातो. ही वाहने मग कारखान्याची वाट धरतात. एकाच वेळी असंख्य वाहने कारखान्याकडे जात असल्याने तेथेही नंबर लावावा लागतो. एका वाहनाला नंबर येईपर्यंत तब्बल चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागते. शिवाय वाहन कारखान्यात घेतल्यानंतरही दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते. या आठ तासांच्या प्रतीक्षेत क्षीणलेल्या शरिराला आराम देण्याकरिता ट्रॅक्टरच्या चालकांनी ही नामी शक्कल लढविली आहे. छत नसलेल्या ट्रॅक्टरमध्ये खाट बांधून झोपाळ्यासारखी सोय करण्यात आली आहे. यामुळे ऊस तोडणीच्या ट्रॅक्टरला शयनकक्षाचे स्वरूप आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका वाहन चालकाने केलेली ही युक्ती ऊस तोडणीवर असलेल्या अन्य ट्रॅक्टर चालकांनीही आत्मसात केली आहे. आता तालुक्यात दाखल झालेल्या प्रत्येक ट्रॅक्टरवर खाट बांधली जात असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. या युक्तीमुळे सततच्या कामांतून मिळणाऱ्या वेळेत चालक व मजुरांना आराम करता येत असल्याचे दिसते.