शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:59 IST

हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देआताच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे काम ‘स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ शहर’चे एक चांगले उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला. मोहिमही यशस्वी झाल्यात. गाव, शहर आणि वॉर्डाची साफ सफाई झाली; परंतु आता या मोहिमेची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसत आहे. यावर मात करण्याकरिता शहरातील एका नगर सेवकाने आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. स्वत:च स्वच्छता करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम तो करीत आहे. केवळ फोटोसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी या आदर्शाचा कित्ता गिरविण्या सारखा असून एक आदर्श नगरसेवक असा असावा असे म्हणायला हरकत नसावी.प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. शासकीय स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष असे की केवळ फोटो काढण्यासाठी सफाई केल्या जाते असे नाहीच. ही सेवा अनेक दिवसांपासून सातत्याने जैसे थे करण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडे घ्यावयाचे झाल्यास हे कार्य खरच प्रशंसनिय ठरते.पालिकेची यंत्रणा असताना ही स्वच्छता या व्यक्तीस का करावी लागते हा प्रश्न निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार या वॉर्डात नगर पालिकेद्वारे नाल्याची स्वच्छता नियमितरित्या पूर्णत: होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही स्वच्छता पालिकेद्वारे नियमित होत नसल्याने गरजेच्या वेळी झाडू, फावडे घेवून नगरसेवक प्रकाश राऊत अस्वच्छता पाहून सेवा देतात. आणखी एक विशेष असे की हे ‘निवडणुका’ पाहून असे करीत तर नाही ना ? असा सवाल ही निर्माण होणे शक्य आहे. परंतु हे कार्य अलिकडेच करतात असे नव्हे तर त्यांची ही सेवा पूर्वीपासून सुरू आहे. दररोज सकाळी १०-११ वाजेपर्यंत स्वच्छतेची मोहीम स्वत: ते नियमित राबवितात.या वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा माणस आहे. वॉर्डात मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची ते दक्षता घेत असल्याचे ते सांगतात.शासनाची स्वच्छता मोहीमही पालिकेद्वारेहिंगणघाट शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या गेली. मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविली. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. त्या काळात स्वच्छतेच्या सुचनांचे पालन करुन घेण्याकरिता कधी सक्ती तर दंडात्मक कारवाई केली. यातून स्वच्छते विषयी जागृती करण्यात पालिका यशस्वी ठरली. आता ही मोहीम संपली असून त्यांचे चांगले परिणामही दिसत आहेत. परंतु गत काही दिवसांपासून शहरात अस्वच्छतेची सुरूवात झाल्याचे दिसते. पुन्हा हे शहर पूर्ववत अर्थात स्वच्छता मोहीमेपुर्वीचे शहर होवू नये अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट