शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 5:00 AM

येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. तर आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असतो.

ठळक मुद्दे२३८२ नागरिक विलगीकरणात : ७९३ हायरिस्क तर १५९८ लो-रिस्कमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यांतर्गत सीमा खुल्या झाल्याने आता गृहविलगीकरण आणि संस्थात्मक विलगीकरणाच्या संख्येत कमालीची घट झाली. एवढेच नव्हे तर तालुक्यातील कोविड रुग्णांचा दैनंदिन नेमका आकडा, झालेले मृत्यू, विलगीकरणतून मुक्त झालेल्यांची माहिती व्यवस्थित मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेची मोठी शोकांतिका आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आर्वी शहरात २४० तर ग्रामीण भागात ८५ वर पोहचली असून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३२०वर जाऊन पोहचली आहे. शहरात नऊ आणि ग्रामीण भागात दोन असे एकूण ११ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. तर आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असतो.जळगाव प्राथमिक केंद्रात मुंबई येथून आलेले ४८ पुणे येथून आलेले १९६ तर इतर जिल्ह्यातून आलेले १७६३ असे एकूण २००७ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर रोहणा आरोग्य केंद्रांतर्गत मुंबई येथून आलेल्या १०६ व्यक्ती, पुणे येथून आलेल्या १७० इतर जिल्ह्यातील२४२१ असे एकूण २६९७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. खरांगणा केंद्रांतर्गत मुंबईहून आलेले २२, पुणे येथून आलेले १०८ तर इतर जिल्ह्यातून आलेले १८३८ असे एकूण १९६८ व्यक्तींचा समावेश होता. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत मुंबईहून आलेले १२० पुण्यावरून आलेले ३३५ तर इतर जिल्ह्यातील २ हजार ७७५ असे ३२३० व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आजपर्यंत आर्वी तालुक्यातील ९ हजार ९०२ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सध्या ७९३ व्यक्ती हायरिस्क तर १ हजार ५८९ व्यक्ती लो रिस्कमध्ये असे एकूण २३८२ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.घोराड येथे २० पॉझिटिव्ह रुग्णघोराड : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख बघता घोराड येथेही रुग्णसंख्या वाढत आहे. घोराडात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. १५ व्यक्तींवर उपचार सुरु असून चार व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहे. बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याचे काम सुरु आहे. मात्र, गावात कोरोनाचहिंगणघाटात कोविड-१९ बचाव समिती गठितहिंगणघाट : तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, न.प.चे मुख्याधिकारी, आमदार, नगरसेवक, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था व व्यवसायिक संघटन तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या सहमतीने कोविड-१९ बचाव समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचे गांभीर्य शहरातील नागरिकांनी घेतले नसल्याने आजघडीला शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. इतकेच नव्हे पर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणून साखळी तोडणे तितकेच गरजेचे आहे.यासाठी काही दिवसांपासून शहरातील काही जागृत नागरिकांनी अधिकाऱ्यांशी व सर्व सामाजिक राजकीय संघटनांशी चर्चा करुन तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरात २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर दरम्यान सात दिवसांसाठी जनसंचारबंदी करण्याचा निर्णय घेतला. २४ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून माझे शहर,माझा परिवार या मोहिमेअंतर्गत कोरोनाची भयावहकता व नागरिकांची बचावात्मक घ्यावयाची काळजी या हेतूने शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन करण्यात येणार आहे.महिलेला श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने तीला पुलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता आॅक्सिजनची मात्रा कमी असल्याने त्यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची कोरोना तपासणी केली असता महिला पॉझिटिव्ह आढळून आली. गावकºयांची दक्षता म्हणून आरोग्य अधिकारी अंकुश देशमुख, परिचरीका माला रायपुरे, सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे, ग्रामविस्तार अधिकारी ईश्र्वर थूल, पोलीस पाटील निरज तुरके भवानी परिसराला भेट देऊन भवानी वॉर्डातील बाधित महिलेच्या संपर्कात येणारा परिसर सील केला.