शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साथ, मृत्यूदर रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:41 IST

पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोविड केअर सेंटरची जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी वर्धा जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मी आज प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरला भेट देऊन जाणून घेतली आहे. कोविड युद्धातील वर्धा जिल्ह्याचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असले तरी पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात आहे. सध्या तो ३ टक्क्यांवर असून आयसीएमआरने ५ टक्के आयडीयल रेशो म्हटला आहे. शिवाय १० टक्क्यांपर्यंत गृहीत धरला आहे. आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था वाढली आहे. चाचण्या वाढल्यावर रेशो कायम राहतो काय हे बघावे लागेल.

दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या वेव्हज येत आहेत, त्या जर आपण बघितल्या तर वर्धेसारख्या ठिकाणी पुढील काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणूनच पुढील महिना महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू दु:खद असून वर्धा जिल्ह्यात फारकाही मृत्यू झालेले नाहीत. मात्र, त्यालाही कसे नियंत्रणात ठेवता येईल याविषयी प्रभावी काम झाले पाहिजे. सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्याल कोविड काळात उपयुक्त ठरत असले तरी भविष्याचे नियोजन केले पाहिजे, असे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाचे काम उत्तमविधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या कोविड केअर युनिटला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयाच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. आरोग्य सभापती मृणाल माटे, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे मँनेजिंग ट्रस्टी परमानंद तापडिया, डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. नितीन गगणे, डॉ. एस. पी. कलंत्री, गिरीश देव, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे आदींची उपस्थिती होती. फडणवीस यांनी ३० मिनिट थांबून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस