शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात दोन लाख लोकसंख्येचा भार ८८ डॉक्टरांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाहेर जिल्ह्यात रुग्णाला न्यायचे असेल तर ईपास शिवाय नेता येत नाही. ती तयार करण्यातच बराचसा कालावधी निघून जातो.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यातील स्थिती : आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर; शहरी, ग्रामीण भागातील रुग्णांची होतेय परवड

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : तालुक्यात दोन लाखांच्या लोकसंख्येकरिता केवळ ८८ डॉक्टर आहेत. १२ हजार लोकांना केवळ एक डॉक्टर सांभाळत असल्याने आरोग्य सेवाच व्हेंटिलेवर असल्याचे चित्र आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयाचे दोन कर्मचारी बाधित झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १९ जुलैपर्यंत उपजिल्हा रुग्णालय परिसर सील करून नगरपालिकेच्या शिवाजी शाळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू केला होता. मात्र, तेथे जाण्यास रुग्णांना मज्जाव केल्याने उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या अनेक गरीब, गरजू रुग्णांची चांगली परवड झाली. परिणामी, खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.उपजिल्हा रुग्णालय बंदच असल्याने या पाच ते सहा दिवसांत स्वॅब नमुने घेण्यात आले नसल्याची माहिती मिळाली.सोमवारपासून उपजिल्हा रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू झाली. आता नमुने घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा आढावा घेतला असता आर्वी शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार तर तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १ लाख ४५ हजार ७४१ लोकसंख्या आहे.शहरात ४०, ग्रामीण भागात २६, तर १२ खासगी डॉक्टरआर्वी शहरात एकूण ४० लहान-मोठे डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहे त. तर तालुक्यातील आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात २६ डॉक्टर, तर खासगी १२ डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० डॉक्टर कार्यरत आहेत. एकूण ८८ डॉक्टर आर्वी शहर व तालुक्यातील दोन लाख लोक सांभाळत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाहेर जिल्ह्यात रुग्णाला न्यायचे असेल तर ईपास शिवाय नेता येत नाही. ती तयार करण्यातच बराचसा कालावधी निघून जातो. त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्वीत दवाखाने बंद आहे. अशा संकटात नागरिक सापडले आहे.२२२ गावे, ७४ ग्रामपंचायतीआर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात २२२ गावे आहेत ७४ ग्रामपंचायती आहेत. मात्र, अपुरे डॉक्टर्स व तोकडी वैद्यकीय सेवा यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील डॉक्टरांकडे रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते.शासनाचे आदेश आहेत. पाळावेच लागतात. यासंदर्भात भाष्य करू शकणार नाही. १४ ते १९ पर्यंत उपजिल्हा रुग्णालय बंद असल्याने स्वॅब पाठविण्यात आले नाही. मात्र २० तारखेपासून रुग्णालय सुरू झाल्याने सॅम्पल पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर