शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

देवळीतील वादग्रस्त नाली बांधकामाला पुन्हा सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:38 IST

महामार्ग प्रशासनाचा प्रताप : नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविल्याचा होतोय आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : देवळीकरांच्या रोषाचे कारण ठरलेल्या वादग्रस्त नालीच्या बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याने महामार्ग प्रशासनाच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. महामार्ग प्रशासनाने देवळीकरांच्या तसेच शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालविल्याचा संताप व्यक्त केला आहे. केवळ कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी या चुकीच्या बांधकामाचा अट्टहास केला जात असल्याचा आरोप होत आहे.

महामार्ग प्रशासनाच्यावतीने देवळीत ३२ कोटींच्या खर्चातून पावणेचार किलोमीटर अंतरात सिमेंट रस्त्याचे तसेच नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील उड्डाणपूल ते विश्रामगृह, औद्योगिक वसाहत चौक, आठवडी बाजार चौक, बसस्थानक तसेच पुढे यशोदा नदीच्या बोगद्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या मार्गावर ३० मीटर रुंदीची हद्द असतांना फक्त १० मीटरमध्ये रस्त्याचे व ३ मीटरमध्ये नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने भडका उडाला आहे. 

याशिवाय प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून विश्रामगृह ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु संबंधित बांधकाम अरुंद रस्त्यात तसेच शेतकरी वर्गाच्या गैरसोयीचे असल्याने नागरिकांच्या रोषाचे कारण बनले. या रस्त्यावर कापूस मार्केट, धान्य मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, बैल बाजार, आठवडी बाजार, ग्रामीण रुग्णालय, खरेदी विक्री समिती तसेच ७ जिनिंग फॅक्टरी व औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांची वर्दळ आहे. कापसाच्या हंगामात शेकडो गाड्या या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. नालीचे बांधकाम तोडण्याची तसेच रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्रांनीसुद्धा ही बाब वारंवार उचलून धरून मागणीला वाचा फोडली आहे. याची दखल घेत महामार्ग प्रशासनाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकार व अधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट रोजी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. नवीन इस्टीमेटनुसार सुधारित बांधकाम करणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात पुन्हा त्याच जागेवर नालीचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

अभियंत्याची कानउघडणी सुधारित इस्टीमेटनुसार रस्त्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले. पहिल्या भागात वर्धा मार्गावरील उड्डाणपूल ते तडस यांच्या खासगी आयटीआयपर्यंत २० मीटर रुंदीचे बांधकाम नियोजित आहे. यात १५ मीटरमध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम, ३ मीटरमध्ये पेव्हर ब्लॉक व २ मीटरमध्ये मातीचे काम केले जाणार आहे. शिवाय दुसऱ्या भागात तडस आयटीआय ते यशोदा नदीच्या बोगद्यापर्यंत १० मीटरमध्ये सिमेंट रस्ता, २ मीटरमध्ये पेव्हर ब्लॉक व २ मीटरमध्ये माती काम नियोजित आहे. नदीच्या बोगद्यापासून माती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती ते विश्रामगृहापर्यंतचे नाली बांधकाम तोडले जाणार नसल्याने, ही बाब जीवघेणी ठरली आहे. त्यामुळे माजी खासदार रामदास तडस संबंधित अभियंत्याची कानउघाडणी केली. ना. गडकरी यांनी न्यायाची भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

"विश्रामगृह ते जोशी पेट्रोलपंप या दरम्यानचे एका बाजूचे नाली बांधकाम हे आहे त्या स्थितीत ठेवले जात आहे. या नालीची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले." - योगेश कुबडे, अभियंता.

"महामार्ग प्रशासनाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम एकसारखे तसेच मध्ये कोणताही अडथळा न ठेवता करण्यात यावे. रस्त्यात चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या नाल्या तोडून कामाला गती देण्यात यावी. यामध्ये कंत्राटदाराने कुचराई केल्यास त्याच्या एजन्सीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची शिफारस करणार आहे." - रामदास तडस, माजी खासदार

टॅग्स :wardha-acवर्धा