शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

विजेच्या धक्क्याने कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खांबावर बिघाड काढण्याकरिता चढला असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

आप्तेष्टांकडून मदतीकरिता महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकवर्धा : वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खांबावर बिघाड काढण्याकरिता चढला असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. किशोर श्रावण टेकाम (३३) रा. गोमाजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. या कर्मचाऱ्याला मदत देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी मृतकाच्या आप्तेष्टांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. यावर अधीक्षक अभियंता देशपांडे यांच्या मध्यस्थीने कंत्राटदाराने ही मागणी मान्य केली. प्रारंभी ५० हजार रुपये रोख व दोन लाख रुपयांचा धनादेश मृतकाच्या वडिलांच्या स्वाधीन केला. शिवाय उर्वरीत रक्कम देण्यासंदर्भात मुद्रांकावर लेखी दिले आहे. हिंगणघाट येथील किशोर टेकाम हा धनश्री इलेक्ट्रीकल्स या कंपनीच्या माध्यमातून महावितरणमध्ये काम करीत होता. गुरुवारी सावंगी येथील एका कामावर असताना त्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. असे असताना सदर कंपनीचे संचालकाने घटनास्थळी येवून पाहिले नसल्याचा आरोप करीत आप्तेष्टांनी अधीक्षक अभियंता देशपांडे यांना कार्यालयात जात घेराव घातला. यावेळी त्यांनी कत्राटदाराशी संपर्क साधत मृतकाच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे सांगितले. त्यांच्या मध्यस्थितीने मृतकाच्या वडिलांना रोख ५० हजार रुपये व दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. उर्वरीत रक्कम मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतून देण्यात येईल, असे मुद्रांकावर लेखी दिले. यावेळी हिंगणघाट पालिकेचे नगरसेवक शंकर मोहमारे, किसना राऊत, राजू टिचूकले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)