शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

गावात तात्काळ संपर्कासाठी संपर्क गट तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:53 IST

जिल्हास्तरावरून एखादी सूचना तात्काळ गावामध्ये पोहचण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे संपर्क गट तयार करावा. त्यांना प्रशिक्षण देऊन, निवडणुक आचारसंहितेच्या काळात तात्काळ संपर्क होण्यासाठी किंवा गावस्तरावरून काही माहिती प्राप्त करण्यासाठी तयार करावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक एन .टी. अबरु यांनी केल्यात.

ठळक मुद्देएन. टी. अबरु : नोडल अधिकाऱ्यांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हास्तरावरून एखादी सूचना तात्काळ गावामध्ये पोहचण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे संपर्क गट तयार करावा. त्यांना प्रशिक्षण देऊन, निवडणुक आचारसंहितेच्या काळात तात्काळ संपर्क होण्यासाठी किंवा गावस्तरावरून काही माहिती प्राप्त करण्यासाठी तयार करावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक एन .टी. अबरु यांनी केल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्याची माहिती पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये मतदान केंद्र तेथील सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, खर्च चमू आणि त्यांची कार्यपद्धती, जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था, स्थिर पथक, चलचित्र चमू, आणि चित्रफीत पाहणारी चमू यांचे गठन केल्याची माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक मनुष्यबळ आणि उपलब्धता, त्यांचे प्रशिक्षण यांची सुद्धा माहिती भिमनवार यांनी दिली.यावेळी पोलीस अधीक्षक तेली यांनी जिल्ह्यातील सीमेवर तैनात करण्यात आलेल्या चमुची माहिती दिली. त्याचबरोबर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शस्त्र जप्ती, दारू साठ्याची जप्ती आणि स्थिर सर्वेक्षण पथकाने पकडलेली रोख याची माहिती दिली. जिल्ह्यात पोलिस अधिकारी कर्मचारी यांची उपलब्धता आणि कमतरता याची सुद्धा माहिती दिली.जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे पॉवर पॉईंट सादरीकरण केले. यामध्ये मतदार जागृती क्लब, राष्ट्रीय मतदार दिनी केलेली मानवी आणि रंगांची रांगोळी, चुनावी पाठशाळा, आयोगाकडून आलेले खेळ , व्ही व्ही पॅट जनजागृती आदींबाबत माहिती दिली. तसेच माध्यम कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगून सर्व माध्यमांवर सूक्ष्म नजर ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय तालुकास्तरावरील कामाचा आढावा त्यांनी जाणून घेतला.मतदान केंद्रावर सुविधा पुरवाअबरु यांनी सर्व मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पोहचविण्यात याव्यात तसेच दिव्यांग मतदारांना रॅम्प, व्हील चेअर आदी सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी एस बी शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णेे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी ठवळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता गजानन टाके, महेश मोकलकर, मुन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर उपस्थित होते.