शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलचे बांधकाम पाच वर्षांनंतरही अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:15 IST

सेलू तहसील कार्यालय व निवासस्थानांचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्या दोन्ही इमारती अद्यापही अर्धवट असून तालुक्याचा कारभार पाहणारे तहसील कार्यालय भाडे तत्वावरील इमारतीत किती वर्षे राहणार,....

ठळक मुद्देकाम पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तहसील कार्यालय व निवासस्थानांचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्या दोन्ही इमारती अद्यापही अर्धवट असून तालुक्याचा कारभार पाहणारे तहसील कार्यालय भाडे तत्वावरील इमारतीत किती वर्षे राहणार, तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामच्या पूर्णत्वास कोणते वर्ष उजाडणार हा आता संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यान्वित यंत्रणा असून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी २ कोटी ३१ लाख ४५ हजार रुपये प्रशासकीय मान्यता दिली. २ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपये तांत्रिक मान्यता तर करारनामा किंमत २ कोटी २९ लाख ४७ हजार रुपये आहे. याबाबत २०१२-१३ मध्ये संबंधित कंत्राटदाराशी करार करण्यात आला. या कामाच्या बांधकामाला ३० मार्च २०१३ रोजी प्रारंभ झाला असून ते ३० एप्रिल २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. यानंतर ३० एप्रिल २०१६ पर्यंत कंत्राटदाराला इमारतीत असलेल्या दोष दुरूस्तीची कामे करायची होती; पण दोन्ही कालावधी संपूण दोन वर्षांचा कालावधी झाला तरी काम अर्धवटच राहिले आहे. निवडणुकीच्या पूर्वी सुरू झालेले काम पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नागरिकांना करावा लागतोय असुविधांचा सामनामागील सहा वर्षांपासून तहसील कार्यालय भाडेतत्वावरील इमारतीतून कारभार चालवित असून ही इमारत विकास चौकात आहे. कॉम्पलेक्सच्या गाळ्यामध्ये असलेल्या या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसण्यासाठीही जागा नाही. मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. दस्तावेज बनविण्यासाठी जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात ये-जा करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे.पंचवार्षिक योजनाशासकीय निधीतून उभी राहत असलेल्या इमारतीच्या बांधकामाला पाच वर्षे पूर्ण झाली तरी ही इमारत उभी ठाकली नाही. पंचवार्षिक योजना तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.दोन्ही इमारतीचा एकच कंत्राटदारतहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत या दोन्ही इमारतींच्या बांधकामाचे कंत्राट एकाकडेच असून दोन्ही कामाचे भूमिपूजन व बांधकाम एकाच दिवशी सुरू झाले. दोन्ही इमारतीचे बांधकाम पाच वर्षे होऊनही पूर्ण झाले नाही. यावरून या कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरदहस्त तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना विचारणा केली; पण कुणीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.