शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

तालुक्यातील १० गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करा

By admin | Updated: April 30, 2015 01:50 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बेढोणा ते पांजरा गोंडी या एकूण १५.४७ किमी रस्त्यांचे बांधकाम मंजूर आहे;

आर्वी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बेढोणा ते पांजरा गोंडी या एकूण १५.४७ किमी रस्त्यांचे बांधकाम मंजूर आहे; पण याच मार्गावरून जाणाऱ्या व तालुक्यातील दहा गावांची ये-जा असणाऱ्या बेढोणा ते चिंचोली (डांगे) दरम्यान असलेल्या दोन किमी रस्त्याचे बांधकाम वगळण्यात आले़ या मार्गावरचा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत़ या रस्त्यांचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़तालुक्यातील बेढोणा ते चिंचोली या दोन किमी लांबीच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत़ हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गाने गुमगाव, पाचोड, हऱ्हासी, ब्राह्मणवाडा, तरोडा, चांदणी, तळेगाव, पानवाडी, पाचोड (ठाकूर), दहेगाव या दहा गावांतील शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची रहदारीच धोक्यात आली आहे़ पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे बांधकाम होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांकरिता या मार्गाने बस धावते; पण खड्ड्यामुळे ती नियमित नाही़ याकडे लक्ष देत दहा गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली़(तालुका प्रतिनिधी)