शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये गोदामे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:37 IST

धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देशेतमालाची होणार साठवणूकशासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार आधार

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी अतिशय परिश्रमाने पिकविलेला शेतमाल सुरक्षित राहावा आणि किमान आधारभूत किंमतीने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या गोदामाच्या बांधकामसाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या माध्यमातून शेतमालाची उत्कृष्ठरित्या साठवणूक करता येईल. बाजारपेठेत चांगला दर मिळेल त्यावेळी शेतमालाची विक्री करता येईल. या सोयीमुळे बाजारपेठेत धान्यमालाला चांगला दर राहिल्यास विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.शेतकरी अत्यंत परिश्रमाने शेतमाल उत्पादीत करतो, मात्र त्यावेळी त्याला योग्य बाजारभाव मिळेल याची हमी नसते. पिकांची काढणी सुरू झाले की, बाजारात दर पडतात. आवक प्रचंड वाढली की, मातीमोल किेंमतीत धान्यमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमाल हाती येताच दर पडले तर शेतमाल तारण योजनेत बाजार समित्यांच्या गोदामात शेतमाल ठेवला जातो. यावर कर्ज देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आहे. पणनच्या माध्यमातून धान्याची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल आणि किमान आधारभूत किंमतीने बाजार समित्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी सुसज्ज अशा गोदामांची मोठी अडचण भासते. ही बाब लक्षात घेवून बाजार समित्यांनी गोदाम बांधण्यासाठी पणनकडे प्रस्ताव सादर केले होते. त्याला सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे राज्यात १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदामं उभारण्यात येणार आहे. गोदाम बांधकामाचा खर्च केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून आणि पणन व बाजार समितीच्या निधीतून होणार आहे. यामुळे शेतकºयांचा धान्यसाठा सुरक्षीत ठेऊन वाढीव दर असताना विकणे सोयीचे ठरणार आहे. या गोदामांमुळे बाजार समिती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.पणन महामंडळाच्या देखरेखीत होणार गोदामाचे बांधकामबांधण्यात येणाऱ्या गोदामांचे प्रमाणिकरण होणार आहे. बाजार समितीच्या आवारात पणन मंडळाच्या देखरेखीखाली गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. गोदामांची उभारणी चांगल्या पद्धतीने दर्जेदार, आवश्यक त्या मोजमापात व नियोजित आराखड्यानुसार झाली पाहिजे हे तपासण्यासाठी नवी दिल्ली येथील वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी लक्ष ठेवणार आहे. त्यानंतरच बांधकाम पूर्ण झालेले गोदाम बाजार समित्यांकडे वापरण्यासाठी हस्तांतरीत होणार आहे. राज्यात १०८ नवे गोदामं होत असले तरी कमीच पडतील. ते वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

वर्धा जिल्ह्यात केवळ सेलू व हिंगणघाट येथे हे गोदाम मंजूर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. धान्याचे भाव कमी असताना शेतकरी गोदामात शेतमाल ठेवू शकतो व भाव समाधानकारक वाढल्यास त्यावेळी विकू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होतो..आय.आय.सुफी, सचिवकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू,एक हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी ५२ टक्के एवढी रक्कम संबंधीत बाजार समितीला द्यावी लागेल, तर ४८ टक्के रक्कम राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मिळेल. वर्धा जिल्ह्यात सेलू व हिंगणघाट येथे प्राधान्याने या योजनेअंतर्गत गोदामे मंजूर झाली असून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल आता त्यांना यात ठेवता येईल. हे काम लवकर व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.विद्याधर वानखेडे, सभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू, जि. वर्धा

टॅग्स :agricultureशेती