शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

स्थळ निश्चितीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:09 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण चार कार्यक्रम वर्धा व सेवाग्राम येथे करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व एसपी यांच्याशी चर्चा : कार्यकारिणी बैठकीसह वर्ध्यात जाहीर सभा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण चार कार्यक्रम वर्धा व सेवाग्राम येथे करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या स्थळ निश्चितीकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व अखिल भारतीय कॉग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत वर्धा व सेवाग्राम परिसर पिंजून काढला; पण कुठल्या स्थळी कुठला कार्यक्रम होईल यावर अधिकृतपणे काँग्रेसच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले नाही.स्थानिक विश्रामगृहात सोमवारी दुपारी १२.१५ वाजता पोहोचलेल्या खा.अशोक चव्हाण व अशोक गहलोत यांच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम काही निवडक काँगे्रस नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा विश्रामगृहातील ‘शिशिर’ या दालनात दुपारी १२.४० पर्यंत चालली. त्यानंतर सदर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची त्यांच्या कार्यालयातील सभागृहात भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी १२.५५ वाजता सुरू झालेल्या बैठकीचा समारोप दुपारी १.२० वाजता झाला. या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने २ आॅक्टोंबरला आयोजित करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक, बापुकुटी परिसरात प्रार्थना,पदयात्रा व जाहीर सभा या विषयी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून सेवाग्राम आश्रम परिसर व वर्धा शहरातील काही स्थळांची पाहणी करण्यात आली. हा स्थळ पाहणीचा कार्यक्रम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता. शिवाय सुरूवातीला कुठल्या-कुठल्या कार्यक्रमासाठी कोणती- कोणती जागा निश्चित केली याची अधिकृत माहिती पक्षांच्यावतीने देण्यात आली नाही. एकूणच जागा निश्चितीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह दिग्गजांची चांगलीच दमछाक झाली होती.सोनिया गांधी व राहुल गांधी येणारकाँग्रेसच्यावतीने आयोजित काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक ,प्रार्थना, जाहीर सभा, पदयात्रा या कार्यक्रमांसाठी काँगे्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष वर्धेत येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. इतकेच नव्हे तर सोनिया गांधी याही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत जिल्ह्यातील गुप्तचर विभागाकडून सध्या दुजोरा दिला जात आहे.दोन कार्यक्रम वर्धेत तर दोन सेवाग्रामात?काँग्रेसच्यावतीने आयोजित बापुकुटीत प्रार्थना, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक,जाहीर सभा, पदयात्रा या कार्यक्रमांपैकी जाहीर सभा व पदयात्रा हा कार्यक्रम वर्धा शहरात तर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक सेवाग्राम परिसरात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी त्याबाबत अद्यापही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जाहीर सभेसाठी सर्कस ग्रांऊडला पंसती दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.गांधी पुतळा परिसरातून निघणार पदयात्रा२ आॅक्टोबरला आयोजित पदयात्रेची सुरूवात सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरातून होऊन ही पदयात्रा वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रामनगर भागातील सर्कस मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे. शिवाय याच मैदानावर जाहीर सभा पार पडेल. या पदयात्रेत सुमारे ३० हजार नागरिक सहभागी होण्याची तर जाहीर सभेला सुमारे ४०-५० हजार नागरिक उपस्थित राहण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नियोजन स्थानिक नेत्यांना करावयास सांगितल्याचे समजते.१३ जणांची जिल्हाधिकाऱ्यांशी बैठकजिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.एन. प्रभु, आश्रम प्रतिष्ठानचे भावेश चव्हाण यांच्यासह एकूण सुमारे १३ मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी सुमारे २५ मिनीटे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.