शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

वर्धा बाजार समितीवरही काँग्रेस-राकॉचा झेंडा

By admin | Updated: July 14, 2015 02:32 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी

वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने बाजार समितीवर असलेली सत्ता राखली. या युतीने १२ जागांवर विजय मिळविला. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाला मात्र तीन जागांवरच समाधान मानावे लागले. तर तीन जागा अपक्षांनी बळकावल्या.जिल्ह्याचे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख तसेच आ. रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात राकाँ-काँग्रेसने ही निवडणूक लढली. यात सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटात युतीचे पांडुरंग श्यामराव देशमुख यांनी २२९, श्याम भीमराव कार्लेकर २१७, मुकेश विनायक अळसपुरे, २१३, शरद बापुराव देशमुख २११, रमेश विठ्ठल खंडागळे २०८ तर कमलाकर विठोबा शेंडे १९८ मते घेत विजयी झाले. या गटातील एक जागा भाजपचे दत्ता भगवान महाजन यांनी २०२ मते पटकाविली. याच गटातील महिला राखीव गटातून युतीच्या वैशाली अनिल उमाटे २०३ तर भाजपच्या अपर्णा विलास मेघे यांनी २०५ मते घेत विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून भाजपचे पवन सुरेश गोडे यांनी २०७ मते घेत विजय मिळविला. विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून राकॉ-काँग्रेस युतीचे सुरेश रामसिंग मेहर यांनी १९८ मते घेत विजय मिळविला. ग्रामपंचायत गटातील निवडणुकीत राकॉ-काँग्रेस युतीचे जगदीश मनोहर मस्के ३०८ व भुषण पद्माकर झाडे २८७ मते घेत विजयी झाले. याच गटातील अनुसूचति जाती जमाती गटातही युतीचे प्रकाश सेवकदास पाटील यांनी ३४२ मते घेत विजय संपादीत केला. आर्थिक दुर्बल घटक गटातून या युतीचे दिनेश कृष्णराव गायकवाड यांनी ३३८ मते घेत विजय मिळविला. व्यापारी अडते गटातील दोन्ही जागा अपक्षांनी बळकाविल्या. यात विजय गजानन बंडेवार यांनी १५२ तर अरविंद बापुराव भुसारी यांनी १४१ मते घेत विजय संपादीत केला. हमाल मापारी गटात शदर देवराव झोड यांनी २७ मते घेत विजय मिळविल्याचे जाहीर करण्यात आले. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समीर देशमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)सेवा सहकारी संस्थेच्या दोन जागांकरिता पुनर्रमोजणी वर्धा बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होईल, असे भाकीत करण्यात आले होते. याचा अनुभव दोन जागांकरिता झालेल्या पुनर्रमोजणीवरून दिसून आले. सर्वसाधारण गटात नरेंद्र पहाडे आणि दत्ता महाजन या दोघांच्या मतात विशेष फरक नसल्याने पुनर्रमोजणीची मागणी करण्यात आली. यात दत्ता महाजन विजयी झाले. याच गटातील महिला राखीव गटातही मागणीवरुन पुनर्रमोजणी करण्यात आली. यात रत्ना हिवंज व वैशाली उमाटे यांच्यात असलेल्या अत्यल्प मतफरकामुळे ही मोजणी करण्यात आली. यामध्ये वैशाली उमाटे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.