शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया बंद खोलीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:32 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देप्रदेश काँग्रेसचे अभय : जिल्हाध्यक्ष कोण होणार, याबाबत निष्ठावंत कार्यकर्ते अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र वर्धा जिल्ह्यात या निवडणुका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या घरातच बंद दार घेण्यासाठी धडपड चालविलेली आहे. पक्षाच्या निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांना या निवडणुकीचा मागमूगही नाही. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष कोण होणार याचीही कुठे चर्चा नाही. चर्चा न करताच या निवडणुका आटोपून आपल्या मर्जीतला रखवालदार अध्यक्ष करण्याच्या हालचाली पुन्हा जोरात सुरू झाल्या आहे.ज्या काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात रणशिंग फुंकले त्या पक्षाच्या अनेक मोठ्या बैठका या पूर्वी वर्धेतून पार पडल्या. आणीबाणीनंतरही वर्धा जिल्ह्याने काँग्रेसला साथ दिली. नव्हे तर इंदिरा गांधींच्या अडचणींच्या काळात इंदिराजींनी पवनार व सेवाग्राम आश्रमात येवून ऊर्जा मिळविली व काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्या काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते वर्धा जिल्ह्यातून निर्माण झाले. यामध्ये कमलनयन बजाज, श्रीमन्ननारायण, प्रभा राव, वसंत साठे, प्रमोद शेंडे, डॉ. शरद काळे यांच्यासह अनेक दुसºया व तिसºया फळीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून दिले.काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले. यातील अनेक नेते कालांतराने पक्षाच्या राज्य व राष्टÑीय स्तरावरही पोहचले. त्या पक्षाची विद्यमान स्थितीत अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाचे दोन आमदार जिल्ह्यात असूनही पक्षातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला दिसून येत आहे. काही महिण्यांपूर्वी पार पडलेल्या प्रदेशाध्यक्षाच्या दौºयाला आमदार स्वत: अनुपस्थितीत राहु शकतो यावरून पक्षातील परिस्थितीचा अंदाज येतो. जिल्हाध्यक्ष नावालाच उरला असून संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून नवा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. पंजाब येथील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते निरीक्षक म्हणून येथे आलेत. मात्र त्यानंतर पुढे निवडणुकीचे प्रक्रियेचे काय झाले याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. भाऊ बहिणच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ठरवेल अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस राहिलेल्या एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. पक्षाचे आमदार अमर काळे व वर्धा विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेले उमेदवार शेखर शेंडे यांनाही या निवडणुकीचा कार्यक्रम काय चालला आहे. याची माहिती नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भाजपचा सर्वत्र झंझावात सुरू असताना काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची अशी चोरीछुप्पी पद्धत कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे.तालुका निवडणूक अधिकाºयांविषयी माहिती गुलदस्त्यातचनिवडणुका घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जिल्हा निवडणूक निरीक्षक नियुक्त केला. त्यानंतर तालुका स्तरावर निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करावयाची होती. मात्र वर्धा जिल्ह्यात आठ तालुक्यात कोण निवडणूक निरीक्षक आहेत याची माहिती ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांना नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. काहींनी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्याकडे संपर्क केला तर तेही समाधान करू शकले नाही, अशी माहिती आहे.