शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीकाळी गड असलेल्या जिल्ह्यात गटबाजीमुळे काँग्रेस खिळखिळी झाली. हीच परिस्थिती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्याने आता काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यापासून तर बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहे. याची सुरुवात सध्या बूथस्तरावरून सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी बदलेले दिसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा पूर्वीची ताकद मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याकरिता शुक्रवारी स्थानिक सद्भावना भवनात काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा प्रभारी जिया पटेल व जिल्हा निवडणूक अधिकारी संजिता सिहाग (राजस्थान) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा, ब्लॉक व बूथ स्तरीय संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे. शनिवारपासून बूथस्तरावरून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्यात ती जिल्हास्तरावर पोहोचणार असून काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बुथ, ब्लॉक व जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

नोंदणीत मागे, पण पदासाठी पुढे-   काँग्रेसमधील दोन गटांतील वाद काही थांबत नसल्याने डिजिटल सदस्य नोंदणीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एकाने गटाने पक्षादेश पाळत काम करायचे आणि दुसऱ्या गटाने त्याला हातभार नाही तर सुरुंग लावायचे, असाच प्रकार सुरू आहे. सद्भावना भवनातील बैठकीदरम्यानही ही गटबाजी दिसून आली. नोंदणीत मागे आणि पद मिळविण्याकरिता पुढे का? असा प्रश्न उपस्थितांना पडला.

अशी होणार जिल्हाध्यक्षाची निवड-   जिल्ह्यातील देवळी-पूलगाव, हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी, वर्धा-सेलू व आर्वी-आष्टी-कारंजा या चार विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १२ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहे. या ब्लॉकमधील प्रत्येक बूथवरून बूथ अध्यक्ष आणि डेलिगेटस् अशा दोघांची निवड केली जाणार आहे. सर्व बूथवरील अध्यक्ष व डेलिगेटस् हे एका ब्लॉकमध्ये सहा सदस्यांची निवड करतील. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष अशी पदे राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक ब्लॉकमधील सहा पदाधिकारी म्हणजे ७२ जणांमधून जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते, हे येणारा काळच सांगेल.

पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यात डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. आता या सदस्यांमधून बूथ, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याकरिता निवडणूक होणार असून, या सदस्यांनाच उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. जिल्ह्यातील १२ ब्लॉकमधून प्रत्येकी सहा पदाधिकारी निवडल्यानंतर, त्या ७२ पदाधिकाऱ्यांतून जिल्हाध्यक्षाची निवड होईल.- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, वर्धा.

जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव मिळाले आहे. या जिल्ह्यात काँग्रेसच एक वेगळ महत्त्व असल्याने येथे काँग्रेसच वाढायला पाहिजे. परंतु, काँग्रेसमधील आपसी गटबाजी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. आता नव्याने सर्वांना एकत्र आणून काँग्रेसला उभारी देण्याची गरज आहे. त्याकरिता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येवून संघटनात्मक बांधणी करावी.- संजिता सिहाग,  जिल्हा निवडणूक अधिकारी.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक