संस्थाचालकांचा आरोप : लाभार्थ्यांवर जबरदस्तीआर्वी: जि.प. महिला बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एमएससीआयटी या संगणक प्रशिक्षणात लाभार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड ही त्याच्या मर्जीने होते. त्याच्या इच्छेने संगणक प्रशिक्षण केंद्राची निवड केल्या जाते. आर्वी पंचायत समितीत मात्र कर्मचारी संगणक प्रशिक्षण केंद्र व लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून विशिष्ट संगणक केंद्रात लाभार्थ्यांना जाण्याचा आग्रह करीत असल्याची ओरड सुरू आहे.जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संगणक प्रशिक्षण केंद्राची निवड ही स्वखुशीने व लाभार्थ्यांच्या सोईनुसार करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु या शासकीय योजनेत आर्वी पं.स.चे काही कर्मचारी व संगणक प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांना हाताशी घेऊन संगनमताने लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांना विविध प्रलोभने देत त्यांच्या संपर्कातील प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची ओरड आहे. त्यामुळे सदर योजनेत पारदर्शकता आढळून येत नसल्याची ओरड आहे. वर्धा जि.प. कडून आर्वी पं.स.ला संगणक प्रशिक्षणासाठी ३४ लाभार्थ्यांपैकी संपूर्ण यादी ही अपात्र ठरवून ठराविक प्रशिक्षण केंद्राचीच यादी पात्र ठरवून लाभार्थीसह या योजनेचा लाभ ठराविक प्रशिक्षण केंंद्राना देण्यात आला. यात आर्वीतील चारही संगणक प्रशिक्षण केंद्राच्या एकत्रित यादीचा विचार घेणे गरजेचे होते. त्यांना समान तत्त्वावर लाभार्थ्यांचे प्रवेश मिळणे गजरेचे होते; परंतु यात पं.स. मार्फत संबंधित संगणक केंद्रात परस्पर लाभार्थी यादी दिल्याचा आरोप आहे.(तालुका प्रतिनिधी)
संगणक प्रशिक्षण केेंद्राच्या यादीत घोळ
By admin | Updated: February 26, 2016 02:35 IST