शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:58 IST

शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : एसडीओंना विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. देवळी तालुक्यातील हातगाव प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या; पण अद्याप मोबदला नाही. कपाशीवर आलेल्या बोंडअळीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले; पण नुकसान भरपाई नाही. अशा अनेक समस्यांना हात घालत देवळी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.देवळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत; पण लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार, अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार, कपाशीवर आलेली बोंडअळी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अद्यापपर्यंत नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले आहे. शिवाय मागील चुकारेही अद्याप अप्राप्त आहेत. शासनाने तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी त्वरित सुरू करावी. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शासकीय चना खरेदी सुरू करावी.कर्जमाफीचे दीड लाखांवरील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता सुलभ पाच वर्षांकरिता बिनव्याजी हप्ते पाडून देण्यात यावे. हातगाव प्रकल्पातील देवळी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्यानुसार ताबडतोब मोबदला मिळावा. नवीन पीक कर्जवाटप मिळण्याच्या दृष्टीने कर्जमाफी यादीची घोषणा करून तातडीने अंमलबजावणी करावी. तेलगंणा राज्याच्या धर्तीवर राज्यातही एकरी पाच हजार रुपये अनुदान शेतीकरिता देण्यात यावे. बोगस बी.टी. बियाण्यांपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाकरिता उपाययोजना करावी. गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या अवाजवी दरवाढीमुळे शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यातही इंधनाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात संजय कामनापुरे, संदीप किटे, राहुल घोडे, श्याम देशमुख, संजय बोबडे, बालू पाटील, वानखेडे, प्रदीप निलस्कर, सुनील निमसडकर, अमोल कसनारे, जयंत वाकडे, महादेव भोयर, प्रवीण डांगे, बबन बिरे, मंगेश वानखेडे, गणेश पाचडे, गुणवंत धांदे, सुनील ठाकरे, विनोद ठाकरे, डॉ. विजय राऊत, अशोक देशमुख, गोपाल उगेमुगे, छोटु देशमुख, गोपाल उगेमुगे, प्रशांत डोंगरे यांच्यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.