शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नाशासाठी ‘कोरा पॅटर्न’ ठरला लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:44 IST

बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकऱ्यांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी निर्मूलनाचा कोरा पॅटर्न सध्या शेतकºयांसाठी लाभदायक ठरला आहे.

ठळक मुद्देपिवळ्या पिंपात लावले लाईट : पतंगांचा भाजून मृत्यू, सर्व शेतांमध्ये सापळे लावण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकºयांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी निर्मूलनाचा कोरा पॅटर्न सध्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला आहे.बोंडअळीबाबत युवा शेतकऱ्यांवर मिडीचा प्रभाव पडताना दिसत आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ व्हॉयरल होत आहे. व यातूनही संभ्रम निर्माण झाला आहे. काय करावे व काय करू नये अशी परिस्थिती शेतकरी वर्गासमोर आहे.कोरा परिसरात निंबोळी अर्काची मागणी वाढली. १ हजार पीपीएम पासून ते १० हजार पीपीएम पर्यंत निंबोळी अर्क बाजारपेठेत मिळत आहे. त्याचप्रमाणे किटकनाशकांची फवारणी व जैविक किटकनाशकांची फवारणी झिरो बजेटचे तंत्रज्ञान यातही शेतकरी वर्ग वापर करू लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बोंडअळीचे पतंग नष्ट करणे यावर कोरा परिसरातील युवा वर्ग जोर देत आहे. त्याकरिता कामगंध सापळ्यांचा वापर केल्या प्रचारात आलेला पिवळ्या कलरचा पिपा व त्यात फोकस लाईटचा वापर करून बोंडअळीचे पतंग संपविण्याचा प्रयत्न कोरा परिसरात केल्या जात आहे. युवा शेतकरी वर्ग सर्व शेतकºयांना सोबत घेवून १० ते १६ चे गट तयार करून पिवळ्या रंगाचा पिपा त्यात फोकस लाईट बसवून गुलाबी बोंडअळीचे पतंग मारण्यासाठी प्रत्येक शेतात बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून या कामाला सर्वच शेतकरी जोमाने भिडले आहेत.परिसरात कामगंध सापळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. त्याच प्रमाणे पिवळ्या पिप्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. बोंडअळीच्या पतंगाप्रमाणेच मित्र किड्यांचे पतंगही यात येतात परंतु बोंडअळीच्या निर्मुलनाकरिता वापर करायला हरकत नाही.नितीन खरात, कृषी सहाय्यक, कोराआम्ही पीपे तयार करून ते शेतात लावले. पिवळ्या रंगावर पंतग आकर्षित होते म्हणून पिवळ्या रंगाचे पीपे तयार केले. त्यात लावलेल्या लाईटमध्ये अनेक पतंग भाजून मरण पावले. एक लाईट चार एकर शेतीकरीता पुरेसा आहे. प्रत्येक शेतकºयांनी ही व्यवस्था करायला हवी.नाना गुंडे, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती