शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बेपत्ता वाघांच्या शोधासाठी प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील शिवाजी नामक वाघ मागील सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) ...

ठळक मुद्देवेळीच योग्य कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील शिवाजी नामक वाघ मागील सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) जंगल शिवारातील वाघाच्या जोडप्यापैकी एक वाघ मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता आहे. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्त्व असलेल्या वर्धा जिल्ह्यातून वाघ बेपत्ता होत असताना वन्यजीव संरक्षण विभाग व वन विभाग दुर्लक्षी धोरण अवलंबत आहे. या दोन्ही वाघांचा शोध घेण्यासाठी संबंधितांना लेखी सूचना करण्यात याव्या. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.बोर अभयारण्याला बोर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघांचे वास्तव्य होतेच. त्यामुळे हे जंगल क्षेत्र वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यावेळी शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य या आरक्षित जंगलात होते. त्याबाबतचे काही पुरावे संबंधित विभागाकडे आहेत. शिवाय शिवाजी नामक वाघ ट्रॅप कॅमेरातही कैद झाला आहे. परंतु, मागील सहा वर्षांपासून तो बेपत्ता असताना शिवाजी नामक वाघ जीवंत आहे काय, तसेच त्याचे सध्या कुठे वास्तव्य आहे याचा साधा शोधही वन विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाकडून घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणाºया यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणी जिल्हाधिकारी या नात्याने आपण लक्ष देत सदर दोन्ही वाघांचा शोध घेण्यासाठी संबंधितांना लेखी सूचना कराव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे विकास दांडगे, नितेश चातुरकर, भुषण येलेकार, शुभम भोयर, रोशन दाभाडे, मयूर ढाले, पवन दंदे, विक्रम येलेकार, वैभव शेंडे, शैलेश कोसे, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Tigerवाघcollectorजिल्हाधिकारी