शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य

By admin | Updated: May 20, 2017 02:13 IST

शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल.

शैलेश नवाल : शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल. उत्पादक गटांना आर्थिक उन्नती साध्य करता येईल. या उद्देशाने शेतमाल उत्पादक कंपन्यांनी कार्य उभारावे. यात शासनाकडून लागणारी आवश्यक मदत करण्यात येईल. व्यक्तिगत कार्याचा विस्तार आता उत्पादक गटात रुपांतरीत करून शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले. मगन संग्रहालय समिती येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, गटविकास अधिकारी विजय लोंढे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय हाडके, मंडळ कृषी अधिकारी धनविजय, विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनीचे डॉ. एन. झेड. भिसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, शेतकऱ्यांनी समूहाच्या माध्यमातून शेतीला लागणाऱ्या निविष्ठा, अवजारे यांची सामूहिकरित्या खरेदी आणि वापर करावा. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. शेतकऱ्यांनी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबविता येईल. यासाठी शेतकरी शेतमाल उत्पादक कंपन्यांची उभारणी महत्वाची आहे. शिवाय उत्पादित शेतमाल खरेदी विक्री करणे, प्रक्रिया करणे, बाजारपेठ मिळविल्यास हातभार लागेल. शेतकरी समूहाचा यात पुढाकार महत्वाचा आहे, असे ते पुढे म्हणाले. यानंतर नवाल यांनी कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा आढावा घेतला. पाईकमारी, वाघेडा येथील रोहयोतील विहिरीच्या खोदकामाची पाहणी केली. दहेगाव येथील मशरूम उत्पादक केंद्राला भेट दिली. गिरड येथे मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास प्रक्रिया विभागाची पाहणी केली. शैलेश भिसेकर यांनी मृदा परीक्षण शाळेविषयी माहिती दिली.