शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

झेडपीच्या संकेतस्थळावर जुन्या माहितीचा संचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ उघडल्यास त्याच्या होमपेजवरच असलेले जिल्हापरिषद इमारतीतचे छायाचित्रच चुकीचे दिले आहे.

ठळक मुद्देअपडेट करण्याकडे दुर्लक्ष : नागरिकांना चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारदर्शक, उत्तरदायी आणि संवेदनशील प्रशासनाव्दारे ग्रामीण जनतेचे सबलीकरण करणे, त्यांचे जीवनमान उंचाविणे आणि ग्रामीण भागाचा विकास करणे, हे उद्दिष्ट्ये घेऊन कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जुन्याच माहितीचा संचन कायम आहे. २०१७ पासून या संकेतस्थळाला अपडेट केले नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून चुकीची माहिती इतरांपर्यंत पोहचविली जात आहे.इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ उघडल्यास त्याच्या होमपेजवरच असलेले जिल्हापरिषद इमारतीतचे छायाचित्रच चुकीचे दिले आहे.त्यानंतर वार्षिक प्रकाशन अहवाल २०१३-१४ चा तर बजेट २०१५-१६ चे दिले आहे. सोबतच या संकेतस्थळावरील झेडपी मेंबर यावर क्लिक केले असता झेडपी कमिटी व झेडपी मेंबर या दोन विंडो उघडतात. मात्र त्यावरील झेडपी कमिटी आणि मेंबरची यादी ही २०१७ चीच कायम दिसून येत आहे.त्यामुळे आताचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती कोण? याची माहिती मिळू शकत नाही. तसेच कमिट्यांचीही माहिती जुनीच असल्याने अनेकांना अडचणीचे जात आहे. या संकेतस्थळावरील बरीचशी माहिती जुनीच असल्याने याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे या संकेतस्थळाच्या माध्यमातून जिल्हापरिषदेचा मागासलेपणा निदर्शनास येत आहे.ग्रामपंचायत अन् लोकसंख्याही चुकीचीग्रामपंचायतीच्या विकासाचा आधार असलेल्या जिल्हा परिषदेकडूनच संकेतस्थळावर ग्रामपंचायतींची चुकीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती असल्याची नोंद आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती आहे. तसेच दर्शविलेली लोकसंख्याही २००१ च्या जनगणनेनुसारच नमुद करण्यात आली आहे. आता लोकसंख्येत बरीच वाढ झाली तरीही या संकेतस्थळावर ही माहिती अपडेट केली नसल्याने चुकीची माहिती दिली उपलब्ध होत आहे.जिल्हा परिषदच्या लेखी १६ विभागजिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आजही १६ विभाग दर्शविले जात असून त्यामध्ये सोळावा क्रमांक जलस्वराज विभागाचा आहे. वास्तविक पाहता जलस्वराज हा प्रकल्प कधीचाच गुंडाळला असून तो विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभागात समाविष्ट करण्यात आला आहे. तरीही संकेतस्थळावर जलस्वराज हा १६ वा विभाग कायम असल्याने कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद