शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अचानक लागलेल्या आगीत साहित्याचा कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:53 IST

एमआयडीसी भागातील प्लॉट क्र. ए-१३ येथील हुसेन अब्बास अली यांच्या मालकीच्या भंगार प्रोसेसिंग युनिटला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचालन आग लागली. क्षणार्धात आगीने परिसरातील साहित्य कवेत घेतले.

ठळक मुद्दे३० लाखांचे नुकसान : शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एमआयडीसी भागातील प्लॉट क्र. ए-१३ येथील हुसेन अब्बास अली यांच्या मालकीच्या भंगार प्रोसेसिंग युनिटला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचालन आग लागली. क्षणार्धात आगीने परिसरातील साहित्य कवेत घेतले. यात ट्रॅकसह विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने हुसेन अब्बास अली यांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सोमवारी रात्रीच्या सुमारास भंगार प्रोसेसिंग युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना तथा अग्निशमन विभागालाही दिली. माहिती मिळताच वर्धा न.प.चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे ४ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत भंगार प्रोसेसिंग युनिटमधील प्लास्टिकचे साहित्य, पेपरची रद्दी, भंगार म्हणून पडून असलेला एमएच २९ एम ८५२ क्रमांकाचा ट्रक व इतर साहित्य जळून खाक झाले. यात हुसेन अब्बास यांचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे दिलीप किटे व किरण आडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सेवाग्राम पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.धुऱ्याच्या आगीत गहू व शेती साहित्य भस्मसातदेवळी तालुक्यातील आंजी अंदोरी शिवारात आंजी येथील विनायक डडमल यांनी त्यांच्या शेतातील धुरा पेटविला. आगीने क्षणात शेजारच्या बाबाराव महादेव सलाम यांच्या मालकीच्या शेतातील गंजी करून ठेवलेल्या गहू व शेतीपयोगी साहित्याला आपल्या कवेत घेतले. या आगीत बाबाराव सलाम यांच्या मालकीचे गहू, कडबा व सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. या प्र्रकरणी सलाम यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी डडमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :fireआग