लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यात मोहता मिल, आर एस आर मोहता मिल्स विवींग अॅन्ड स्वीविंग, हिंगणघाट इन्टीग्रेटेड टेक्सटाईल्स पार्क, गिमाटेक्स प्रा.लि.वणी या कंपन्यांमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे.या कामगाराच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हिंगणघाट तालुक्यातील सदर चारही वस्त्रोद्योगातील कंपन्यांबाबत त्यांचे लक्ष वेधले.या प्रकरणी लक्ष घालून कामगारांना न्याय दिला जाईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती माजी आमदार तिमांडे यांनी दिली आहे. हिंगणघाट येथील मोहता मिल १२५ वर्ष जुना आहे. मोहता ग्रुप या मिलच्या भरवशावर गिमाटेक्स वणी, पीव्ही टेक्सटाईल्स जाम, आरएसआर मोहता मिल बुरकोणी या कंपन्या उभ्या आहेत. सहा महिण्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम देण्यात येत नाही. मागील २० वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना व्यवस्थापनाने कायम केलेले नाही. अरेरावीची भूमिका कामगारांप्रती घेतली जाते अशी माहितीही तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. आॅक्टोंबर २०१८ पासून कामगारांना ले आॅफ दिल्या जात आहे. कामगार आयुक्त नागपूर यांच्या कडे अनेक बैठका झाल्यात मात्र अजुनही कामगारांना न्याय मिळाला नाही. असे तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. कामगारांना कमी केले जात आहे. अनेक महिला कामगारांना किमान वेतनही दिले जात नाही. त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची माहिती तिमांडे यांनी दिली.
कामगारांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
गिमाटेक्स प्रा.लि.वणी या कंपन्यांमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे. या कामगाराच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हिंगणघाट तालुक्यातील सदर चारही वस्त्रोद्योगातील कंपन्यांबाबत त्यांचे लक्ष वेधले.
कामगारांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
ठळक मुद्देहिंगणघाट परिसरातील उद्योगात कामगारांचे शोषण