सेवाग्राम : येथील इंदिरा गांधी उड्डान पुलावरील पथदिव्यांचे केबल उघडे पडले असून यातील काही पथदिवे बंद अवस्थेत आहे. या पुलावर काळोख असतो. यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.या पुलावरील काही भाग उखडला असून काळोखामुळे अपघताची शक्यता नाकारता येत नाही. सेवाग्राम ते वर्धा मार्गाला जोडणाऱ्या या पुलावरुन सतत वर्दळ असते. येथे पथदिवे देऊन नागरिकांची सोय करण्यात आली. मात्र दुरुस्तीअभावी पथदिवे कुचकामी ठरताना दिसत आहे. काळोखाचा फायदा घेत समाजकंटकांकडून पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे पथदिवे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर) \
पुलावरील पथदिवे नादुरुस्त असल्याने बंद
By admin | Updated: June 3, 2015 02:20 IST