प्रत्येक ग्रामपंचायतीला राबवावी लागणार स्वच्छग्राम स्पर्धासचिन देवतळे विरूळ (आकाजी)शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता. अनेक गावे आरशासारखी स्वच्छता झाली होती; पण आता नव्या शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी ग्रा.पं.ने केलेल्या मुल्यमापनाचे निकष शासनाने जाहीर केले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रा.पं. ला या नियमांची जाण ठेवणे गरजेचे आहे.या स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनाला ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० गुण, घनचकरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन २० गुण, घर गाव परिसर स्वच्छतेला ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५ गुण तसेच लोकसहभाग आणि सामूदायिक स्वयं-पुढाकारातून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला १० गुण दिले जाणार आहेत.पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाला कमाल २० गुण आहेत. यामध्ये पाणी पुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्यास आणि पाणी पट्टी वसुलीचे प्रमाण १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. ग्रामपंचायतीकडे स्व-निर्मिती आणि सुरक्षितता आराखडा असल्यास दोन गुण, गावात पाणी पुरवठा योजनेतून दिलेल्या घरगुती नळ जोडण्यांची संख्या ९१ ते १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. गावातील एकूण सर्व पाणी पुरवठ्याच्या सुविधांमधून कुठेही पाणी गळती नसल्यास दोन गुण, ९९ टक्केच्या खाली असल्यास एक गुण देण्यात येणार आहे.वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाच गुण ठेवण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना आरोग्याच्या योग्य सवई, नागरिकांच्या योग्य सवईसाठी गुण दिले जाणार आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार नसणे यावर गुण दिले जाणार आहेत. लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तसेच गावात गत पाच वर्षांत जातीय दंगल न झाल्यास, गावात अतिक्रमण नसल्यास यावरही योग्य गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गावासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने जर स्वच्छ अभियान स्पर्धा मन लावून आणि कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता राबविली तर प्रत्येक गाव आरोग्य संपन्न होईल, हे निश्चित!
स्वच्छता अभियानात मिळणार मूल्यमापनानुसार गुण
By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST