शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 27, 2014 23:46 IST

शहराचे सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधा शहरवासीयांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक नगर प्रशासनाची आहे. पण गर अनेक दिवसापासून शहरात

पुलगाव : शहराचे सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधा शहरवासीयांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक नगर प्रशासनाची आहे. पण गर अनेक दिवसापासून शहरात स्वच्छतेच्या अभावी शहरातील मुख्य ठिकाणीही कचऱ्याचे ढिग साचले आहे. पावसामुळे दुर्गंधी वाढली आहे. साफसफाईअभावी शहरवासीयांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.केरकचरा साठविण्यासाठी नगर परिषदेतर्फे लाखो रुपये खर्चून शहरात प्रत्येक वार्डात काही वर्षापूर्वी टिनाचे ढोले लावण्यात आले होते. परंतु त्यात साठविण्यात आलेला कचरा ढोल्यातच जाळल्या जात असल्यामुळे बहुतेक ढोले निकामी झाले व भंगारात निघाले. त्यानंरच प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी नगर परिषदेद्वारे लोखंडी कचराकुंड्या लावण्यात आल्या होत्या. याचेही काही महिन्यातच वारे न्यारे झाले.नंतर १९ वार्डात घंटागाड्यांद्वारे शहरातील कचरा जमा करून गावाबाहेर नेण्यात येत होता. परंतु या घंटागाडी वाल्यावर घंटागाडीची निगा राखणे व स्वत:चा खर्च काढण्यासाठी प्रत्येक घरापोटी १० रुपये दिले जाणार होते. परंतु या घंटागाडीच्या खर्चास शासनाची मंजुरी नसल्यामुळे घंटा गाडी चालकाच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. अनेक घंटागाड्या नगर परिषद प्रांगणातच जमा करण्यात आल्या होता. मागील एक महिन्यापासून अनेक प्रभागात घंटा गाडी दिसेनाशी झाली आहे. सध्या कचरा उचलण्यासाठी नगर परिषद मध्ये पाच कायझन घंटागाड्याचे आगमन झाले. पण चालकाच्या प्रतीक्षेत त्या नगर परिषद प्रांगणात उभ्या आहेत. नगर प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे शहरातील अनेक भागातील नाल्या साफ करण्यात न आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. धर्मशाळा, पोस्ट आॅफिस, इंदिरा चौक, दीनदयाल उपाध्याय चौक याब महत्वाच्या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. नगर प्रशासनाने आरोग्यास धोकादायक असणाऱ्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)