शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतचे हॉटेल बनले बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे.

ठळक मुद्देखुनांच्या घटना वाढीला कारणीभूत : पोलीस प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. परंतु, जिल्हा पोलीस प्रशासन गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे वागत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे.वर्धा शहरालगत नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सेवाग्राम, नागठाणा आदी परिसर येतो. शहराबाहेरून वळणमार्गाही गेलेला आहे. या मार्गालगत गत काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे थाटण्यात आले आहेत. कित्येक हॉटेल, ढाब्यांवर जेवणासोबतच दारूची सहज उपलब्ध होत आहे. वर्धा शहरातील अनेक नामांकित हॉटेलातही टेबलाखालून ग्राहकांना दारूचा पुरवठा केला जातो. या हॉटेलमधून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला आहे. परंतु, आजवर एकाही हॉटेल व ढाब्यावर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने छापा घातलेला नाही. या हॉटेलमध्ये कुटुंबासह काही लोकं जेवणासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील भागात शेड उभारले आहे. येथे शौकिन दारूरंगी रंगताना दिसतात. दारू विक्रीमुळे हॉटेलमालकांचा गल्ला मोठ्या प्रमाणावर वाढत असून या अवैध व्यवसायाला आता अधिकृत धंद्याचे स्वरूप आले आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वर्धा शहर पोलीस ठाणे, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम आदी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी कुणाचेही या अवैध दारूविक्रीकडे लक्ष नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पालकमंत्र्यांना दिली होती महिलांनी माहितीवर्धा जिल्हा दारूबंदी आहे. येथे अवैध दारूव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. याबाबत काहीतरी करा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महिलांनी केली होती. यासोबतच तिगाव येथील महिलांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली नाही.अंडीविक्रीच्या गाड्या मुख्य केंद्रवर्धा शहरात विविध ठिकाणी २५ गाड्यांवरून अंडीविक्री केली जाते. येथेही राजरोसपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. तरीही पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. शहरात व जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात खुनाच्या पाच घटना घडल्या. पोलिसांचा दराराच न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी