शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पुलगाव शहरात उकिरड्यांची रास

By admin | Updated: January 5, 2015 23:09 IST

पुलगाव शहरात कचऱ्याचा विळखा पडला आहे. सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच, उकिरडे आणि यामुळे सुटणारी दुर्गंधी याचा सामना करताना पुलगाववासियांच्या नाकीनऊ आले आहे.

वर्धा : पुलगाव शहरात कचऱ्याचा विळखा पडला आहे. सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच, उकिरडे आणि यामुळे सुटणारी दुर्गंधी याचा सामना करताना पुलगाववासियांच्या नाकीनऊ आले आहे. डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने जनारोग्य धोक्यात आले आहे. शहरातील प्रमुख कार्यालय असलेला परिसर तर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. शहरात विकासकामात सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र येथेही कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. परिणामी सौंदर्यीकरणाला बकालपणाचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाकरिता प्रभावी मोहीम राबविण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. कचरा टाकण्यासाठी कचरा परिसरात कचरा कुंड्याही नसल्याने नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला काही अंतरावर कचरापेटीची व्यवस्था केल्यास इतरत्र विखुरलेला कचरा नजरेस पडणार नाही. काही भागात पालिका प्रशासनाने कचऱ्याचे ढोले ठेवले आहे. मात्र ही व्यवस्था तोकडी पडत असल्याचे दिसते.कचरा व्यवस्थापनाकरिता निद्रिस्त पालिका प्रशासनाला कधी जाग येईल असा प्रश्न पुलगावकर उपस्थित करतात. यापुर्वी शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले होते. याकरिता कचऱ्याच्या समस्येवर गांभीर्याने तोडगा काढणे गरजेचे ठरते. कचऱ्याच्या ढिगांवर गुरे, बकरी, वराह असे प्राणी चाऱ्याचा शोध घेतात. प्लास्टिक पिशव्यांचे भक्षण केल्यामुळे या पशुंवर विपरीत परिणाम होताना दिसतात. याची दखल घेत कचरा निर्मुलन मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)