शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांनी कोंडून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:37 IST

ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.

ठळक मुद्देतळेगाव ग्रामपंचायतीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.गावकऱ्यांना आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळते. यामुळे या भागातील नागरिक आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहेकर यांच्या नेतृत्त्वात एकत्र आले. यावेळी जि.प. सदस्य अंकीता होले याही उपस्थित झाल्या. त्यांनी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करू असे म्हणताच गावकºयांकडून त्याला विरोध झाला. या समस्येवर तात्पुरता उपाय नको तर ती कायमस्वरूपी मार्गी लावा, असे म्हणत सुनील मोहेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली.येथे गावकºयांच्या समस्या ऐकूण घेण्याकरिता एकही पदाधिकारी आला नसल्यामुळे शेवटी नागरिकांनी स्वत:ला ग्रा.प. कार्यालयात कोंडून घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही, अशी भूमिका गावकºयांनी घेतली. पदाधिकाºयांची चौकशी केली असता सरपंच कारंजाला लग्नसमारंभात, पं.स. सदस्य तथा उपसभापती चंद्रपूरला असल्याचे सांगितले. अशावेळी तळेगाव ग्रा.पं. चे सचिव हे सुद्धा सुट्टीवर असल्याचे समोर आले. यामुळे न्याय कोणाला मागावा असा पेच नागरिकांसमोर पडला. सध्या तळेगाव ग्रा.प.ला प्रभारावर असलेले राठोड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तुम्हाला मुबलक पाणीपुरवठा करू या आश्वासनावर ग्रामस्थ कुलूप उघडून बाहेर आले.एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे अपव्ययपाण्यासाठी वॉर्ड क्रमांक ६ चे ग्रामस्थ आंदोलन करीत आहे. तर याच गावातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सरकारी नळ हा भरदुपारी १२ वाजेपर्यंत धो धो वाहत होता. त्यामुळे येथे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. तो लिकेज शोधण्याकरिता गत दोन दिवसापासून आठ मजूर कार्यरत आहे. तो लिकेज सापडताच पाणी पुरवठा हा सुरळीत होईल.- सुनीता जोरे, सरपंचसरपंच व सचिवाला नेहमी वॉर्डाबद्दल सांगतो की पाणीसमस्या आहे. पण माझ कोणीच ऐकत नसून सचिव सरपंच हे म्हणतात की आम्हाला सर्व समजते. अशावेळी न्याय कोणाला मागावा- सुनील मोहेकर, ग्रा.पं. सदस्य वॉर्ड क्र.६पाणी समस्येबाबत सरपंचाना फोन लावला असता तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हीच करा असे म्हटले.- मनीषा गाखरे, त्रिवेणी कालमु, ग्रामस्थ वॉर्ड क्र. ६